Drip Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Subsidy : ठिबक अनुदानाची अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Drip Irrigation : सुमारे १० हजार शेतकऱ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर अनेकांना पहिला हप्ता मिळालेला नाही.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात सूक्ष्मसिंचन अनुदान दिवाळीच्या काळात वितरणास सुरुवात झाली. परंतु अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. सुमारे १० हजार शेतकऱ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर अनेकांना पहिला हप्ता मिळालेला नाही.

जळगाव, चोपडा, यावल, रावेर, जामनेर भागातही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे. शासनाने ऑक्टोबर महिन्यातच ठिकबबात अनुदान मंजूर केले होते. निवडणुकीपूर्वी ही कार्यवाही झाली. नंतर निवडणूक काळात अनुदान आले नाही.

जिल्ह्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले होते. हे अनुदान प्राप्त झाल्यानंतर त्याचे अनेक दिवस वितरणच झाले नाही. परंतु नोव्हेंबरमध्ये काही भागात अनुदान देण्यात आले. अनुदान डीबीटी पद्धतीने देण्यात आले.

परंतु अनेक भागांत शेतकरी पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील फेब्रुवारी व मार्च महिन्यात ज्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रात जिओ टॅगिंग झाली व त्यांचे प्रस्ताव मार्गी लागले. परंतु नंतर झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीत.

जिल्ह्यात सुमारे १५ हजारांवर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून ठिबकवर खर्च केला. त्यासाठी अनुदान मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु हे अनुदान प्राप्तच झालेले नाही. शासन ज्या योजनांबाबत मागणी नव्हती,त्या योजना आणत आहे व त्यावर खर्च करीत आहे.

परंतु शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानासाठी वर्षभर किंवा यापेक्षा अधिक कालावधी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष तयार झाला आहे. नव्याने योजनेसाठी निधी नसल्याने ठिबकचे नवे प्रस्ताव तयार होत नसल्याची स्थिती आहे. पोखरा योजनेतूनच शेतकऱ्यांना हा लाभ आहे. पण पोखरा योजनेतील गावांची संख्या कमी आहे.

सूक्ष्मसिंचन योजनेत ठिबक संच अधिकचे घेण्यात आले आहेत. तसेच तुषार संचही अनेकांनी घेतले आहेत. काही ठिबक वितरकांनी विश्वासावर उधारीने शेतकऱ्यांना अनुदान येईल, यासाठी ठिबक दिले आहे. परंतु अनुदान आलेले नसल्याने अनेक ठिबक वितरक अडचणीत आले आहेत. अनुदान वितरण गतीने व तातडीने केले जावे. कृषी विभागाने त्याबाबत तत्परतेने काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT