Sowing Machine Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Machinery : दोन इंजिनिअर तरूणांनी शोधला मजूर टंचाईवर उपाय; अकोल्यात केली ३५ प्रकारच्या शेती अवजारांची निर्मिती

Team Agrowon

१) स्वयंचलित बहुपीक पेरणी यंत्र वापर फायदेशीर (sowing machine)

पेरणीसाठी पारंपारिक बैल चलित पेरणी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, या पद्धतीमध्ये जास्त बियाण्यांचं प्रमाण, असमान बी पडणं, पेरणीसाठी जास्त वेळ लागणं अशा अडचणी असतात. अलीकडे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचा वापर वाढला असला तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं नाही.

या सर्व बाबी लक्षात घेऊन बैलचलित आणि ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राचा पेक्षा स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्र वापर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतो. या यंत्राला इंजिन असलेला भाग आणि पेरणी यंत्र असे दोन भाग असतात. या यंत्राद्वारे प्रति तास एक एकर पेरणी करतात येते, अशी माहिती शेतकरी देतात.

२) उत्तर प्रदेशात उभारणार कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ

उत्तर प्रदेश सरकारनं बुधवारी कुशीनगर जिल्ह्यात महात्मा बुद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यास मंजुरी दिलीय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. कुशीनगरमधील विद्यापीठ ७५० कोटी रुपये खर्चून ३९० एकरपेक्षा जास्त जागेवर बांधलं जाईल. यामध्ये १० जिल्ह्यांचा समावेश असेल.

तसेच विद्यापीठाची पायाभरणी पुढील महिन्यात होणार असून २०२६ पर्यंत बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती उत्तरप्रदेशचे कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही कौशांबी यांनी दिली. कुशीनगर येथे फळांसाठी इंडो-इस्रायल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेसाठी मोफत जमीन देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याचंही ते म्हणाले.

३) शेती तंत्रज्ञानासाठी भारत आणि इस्रायल एकत्र

भारत आणि इस्रायल हे कृषी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी विविध उपक्रमांसाठी परस्पर करार करणार आहेत, असं नवी दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासातील डेप्युटी चीफ ऑफ मिशन ओहद नकाश कायनार यांनी सांगितलंय.

इस्रायलची ऑर्गनायझेशन आणि भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्यात अधिक कार्यक्षम कृषी तंत्रज्ञानासाठी परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागच्या काही वर्षांत दोन्ही बाजूंनी पाण्याचा पुनर्वापर, फर्टिगेशन, माती व्यवस्थापन, ठिबक सिंचन, डिसॅलिनेशन, पाणी गळती शोध, मातीविरहित शेती, पावसाचं पाणी साठवण आणि पाणी सुरक्षा तंत्रज्ञान यावर एकत्र काम केलं आहे.

४) डॉ. पंजाब देशमुख कृषी विद्यापीठानं विकसित केला सौरउर्जा कीटक सापळा

किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी अलीकडे शेतकरी सौरउर्जेवर चालणाऱ्या कीटक सापळ्यांचा वापर करु लागलेत. या सापळ्यांमुळं कमी खर्चात कीड नियंत्रण होते. बाजारात विविध प्रकारचे कीटक सापळे उपलब्ध असले तरी एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पीडीकेव्ही सोलर लाइट इंसेक्ट ट्रॅप विकसित केला आहे.

हा सापळा पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालतो. बॅटरी फोटोव्होलटाइन पॅनलद्वारे चार्जिंग केली जाते. त्यामुळं विजेची बचत होते. यामधून निघणारा प्रकाश किडींना आकर्षित करून घेतो. तसेच सोलर फोटोव्होलटाइन पॅनेल, चार्ज कंट्रोलर आणि पॅनलद्वारे उत्सर्जित झालेली ऊर्जा साठविण्यासाठी लीड अॅसिड बॅटरी वापरण्यात आलीय. हा सापळा पूर्णतः स्वयंचलित आहे.

एक ट्रॅप दोन एकर क्षेत्रफळापर्यंत कार्य करू शकतो. सापळ्याची उंची ही पिकाच्या उंचीनुसार १० फुटांपर्यंत ठेवता येते. हा सापळा बागेत फळबागेत, शेडनेट, पॉलिहाउसमध्ये वापरता येऊ शकतो, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं दिली आहे.

५) मजूर टंचाईवर शोधलाय दोन इंजिनियर तरूणांनी उपाय

पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत मजूर टंचाई शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नाही. त्यात एकीकडे मजुरांची दिवसेंदिवस वाढणारी रोजंदारी आणि दुसरीकडे शेतमालाला किफायतशीर दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर समस्या निर्माण झालेल्या आहेत.

या समस्या सोडवण्यासाठी अकोला येथील अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे या दोन मॅकेनिकल इंजिनियर असलेल्या तरूणांनी अॅग्रोशुअर प्रॉडक्टस स्टार्टअप सुरू करून शेती अवजारांची निर्मिती केलीय. यामध्ये पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत विविध प्रकारच्या ३५ अवजारं या दोन तरूणांनी निर्माण केली आहेत.

यामध्ये मानवचलित आणि स्वयंचलित अशा सर्वप्रकारच्या यंत्राचा समावेश आहे. या तरूणांच्या अवजारांची तपासणी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख अकोला कृषी विद्यापिठाकडून करण्यात येते. त्यानंतर ते बाजारात विक्रीसाठी आणले जातात. शेतीतील अवजारांच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील अशा विश्वास अक्षय वैराळे यांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT