Agriculture Machinery: दोन तरुण भावांनी अवजार भाड्यानं देऊन केली ११ लाखांची कमाई

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

निवाऱ्याची व्यवस्था

भागेमहारी गावानजीक बंड कुटुंबीयांची शेतजमीन आहे. तेथे अवजारे ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.

Agriculture | Agrowon

अवजारे भाडेतत्त्वावर

याच ठिकाणावरून शेतकऱ्यांना अवजारे भाडेतत्त्वावर दिली जातात.

Agriculture | Agrowon

रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर

हंगामात रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर या अवजारांना चांगली मागणी असते. या व्यवसायातून गेल्या हंगामात ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, असे बंड यांनी सांगितले.

Agriculture | Agrowon

बैलांच्या माध्यमातून शेती

सुरुवातीला बैलांच्या माध्यमातून शेती कसण्यावर बंड यांचा भर होता.

Agriculture | Agrowon

यांत्रिकीकरणाकडे वळण्याचा निर्णय

परंतु चाऱ्याची कमतरता आणि जनावरांच्या संगोपनावर होणारा खर्च यामुळे त्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळण्याचा निर्णय घेतला. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतून अनुदान घेऊन अवजार बॅंकेची स्थापना केली.

Agriculture | Agrowon

अवजारांची खरेदी

त्याकरिता ४० टक्‍के अनुदान मिळाले. साधारण ५ लाख ६५ हजार ८५६ रुपयांच्या अनुदानावर आठ अवजारे मिळाली. याशिवाय काही अवजारांची खरेदी त्यांनी स्वखर्चातून केली.

Agriculture | Agrowon
Apple | Agrowon
अधिक पाहण्यासाठी