Manoj Jarange Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange Patil : बीडच्या दुष्काळ स्थितीचा मनोज जरांगे यांच्या सभेला फटका

Drought on Beed : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी सभा होणार होती. मात्र यावर आता दुष्काळाचे सावट आले असून ही सभा रद्द करण्यात आली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे रणशिंग फुंकले आहे. ४ जून पासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. तसेच ८ जूनला बीड येथील नारायण गडावर सभा होईल असेही त्यांनी म्हटले होते. पण आता ही सभा उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाईमुळे रद्द करावी लागली असून पुढची तारीख समाजाची बैठक घेऊन निश्निच करण्यात येणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी बीड येथील नारायण गडावर सभा आयोजित होती. मात्र आता यावर दुष्काळाचे सावट घोंगावत असून पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे.

जरांगे यांच्या ८ जून रोजी बीडमध्ये होणाऱ्या सभेसाठी तब्बल ९०० एकर जमिन तयार करण्यात येणार होती. तसेच या सभेसाठी तब्बल ६ कोटी मराठा बांधव उपस्थित राहतील, अशीही शक्यताही वर्तवण्यात येत होती. यामुळे या सभेची राज्यभर चर्चा सुरू झाली होती.

यादरम्यान 'टीव्ही ९ मराठी'ने दिलेल्या वृत्तानुसार बीडमध्ये असणारी पाणीटंचाई आणि नारायणगड परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. यावरून येथे येणाऱ्या लोकांची गैर सोय होऊ नये म्हणून सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

बीड धरणातील पाणीसाठा

दरम्यान राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने प्रकाशित केलेल्या जलाशयातील उपयुक्त पाणीसाठ्याच्या स्थितीनुसार राज्यातील सर्व २९९४ धरणांमध्ये २५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो गेल्या वर्षी याच दिवशी ३६.७१ टक्के होता. तर छत्रपती संभाजीनगर विभागातील ४४ धरणांध्ये पाणीसाठा १०.६७ टक्क्यांवर आल्याचे समोर आले असून बीडमध्ये स्थिती गंभीर आहे. येथील माजलगाव आणि मांजरा या मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा शून्य टक्क्याच्या खाली गेला असून मांजरा धरणात फक्त १.२९ टक्के पाणीसाठा आहे.

बीडमध्ये टँकर १ कमी ४००

बीडमध्ये सध्या टँकरची संख्या वाढतच आहे. येथे ३२१ गावे २९३ वाड्या वस्त्यांवर ३९९ टँकरेद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: प्रस्तावित ‘शक्तिपीठ’साठी इंचभरही जमीन देऊ नका: राजू शेट्टी

Chhatrapati Sambhajinagar DPDC Meeting: ‘डीपीडीसी’ बैठकीत ९०९ कोटींचा आराखडा मंजूर

Vidarbha Farmer Issues: सिंचनाच्या अभावामुळेच शेतकरी आत्महत्या

Fake Fertilizers Seeds Issue: बोगस बियाणे, खत काळाबाजार प्रकरणांत थेट गुन्हे दाखल करा : विखे पाटील

Pomegranate Heatwave Damages: उन्हामुळे डाळिंब बागायतदारांच्या स्वप्नांना तडे

SCROLL FOR NEXT