Manoj Jarange Patil : पोटदुखीने जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणावर ठाम

Maratha Reservation News : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसापासून उपोषणासा बसले आहेत. आज गुरूवार (१५ रोजी) त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilAgrowon
Published on
Updated on

Pune News : मराठा समाज्याच्या आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज गुरूवार (१५ रोजी) सहावा दिवस आहे. यादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. तसेच आता त्यांना पोटदुखीचा त्रासही वाढला आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा रेटा आता अंतरवाली सराटीकडे निघत आहे. यापूर्वी बुधवारी (ता.१४) जरांगे यांची तब्बेत खालावली होती. त्यांच्यावर उपचार करण्यास सुरूवात केली आहे. आजही त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना दोन सलाईन लावण्यात आल्या होत्या. यातही त्यांची तब्बेत खालावल्याने आता अंतरवालीत मराठा समाजानं गर्दी केली आहे. 

जरांगेंनी सगेसोयरे शब्दाची अमंलबजावणीसाठी उपोषण सुरूच ठेवणार, असा निर्धार केला आहे. तसेच सरकारच्या चालढकलीमुळे आता पुन्हा एकदा ग्रामीण भागातील जनता जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीकडे निघत आहे. तर त्यांनी उपचारास नकार दिल्याने डॉक्टरांसह आंदोलन स्थळावरील अनेकांनी त्यांना विनवण्या केल्या आहेत. मात्र जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम असून त्यांनी आधी अध्यादेशाची अंमलबजावणी करा, मगच पाणी घेतो असे म्हटले आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Hunger Strike : उपचार घेणार की नाही, भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे जरांगे यांना निर्देश

पोटदुखीने जेरीस  

मराठा आरक्षणासाठी एका वर्षात जरांगे यांनी तीन वेळा आंदोलन केले आहे. याचा थेट परिणाम त्यांचा प्रकृतीवर झाला आहे. यातच आता पुन्हा एकदा त्यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. यामुळे कालपासून त्यांची तब्बेत बिघडली आहे. आज त्यांचा अशक्त वाढला असून पोटदुखीचा त्रासही वाढला आहे. 

सामूहिक आरतीचं आयोजन 

जरांगे यांच्या प्रकृती खालावल्याची बातमी राज्यभर पसरली आहे. यामुळे मराठा समाज चिंतेत असून पुण्यात सकल मराठा समाजाने सामूहिक आरतीचं आयोजन केले आहे. जरांगे यांना बरं वाटावं म्हणून येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. 

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा आमरण उपोषण

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात रुद्र अभिषेक

मनोज जरांगे पाटलांची तब्येतील सुधारणा व्हावी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी संभाजी राजेंच्या स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात रुद्र अभिषेकाचे आयोजन केले होते. 

धाराशिव बेमूदत बंद? 

धाराशिवमध्ये मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. येथील सांजा गावातील मराठा तरुणांनी सरकार विरोधात घोषणा देत धाराशिव बेमूदत बंदची घोषणा केली आहे. तसेच गावातील तरूण बैलगाडी, दुचाकी घेऊन धाराशिव शहराकडे निघाले आहेत. तर धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com