Mango  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Rate : कळमनामधील बाजारात आंब्याचे दर दबावात

Mango Season : आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातून कळमना बाजारात आंब्याची आवक नियमित होत आहे. मात्र, दर दबावात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात आंब्याला १५०० ते ३००० रुपये दर असताना या आठवड्यात हे दर १८०० ते २००० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

Team Agrowon

Nagpur Mango Rate : आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातून कळमना बाजारात आंब्याची आवक नियमित होत आहे. मात्र, दर दबावात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात आंब्याला १५०० ते ३००० रुपये दर असताना या आठवड्यात हे दर १८०० ते २००० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने येत्या काळात आंब्याची आवकही कमी होईल, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

आंध्र, तेलंगणा राज्यातील आंब्यासाठी कळमना ही मोठी बाजारपेठ मानली जाते. हंगामात आंब्याची उलाढाल काही कोटींच्या घरात राहते. गेल्या आठवड्यापर्यंत आंबा आवक दोन हजार क्‍विंटलची होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने ही आवक १०० क्‍विंटलपर्यंत खाली आली आहे. दरातही घसरण नोंदविली गेली.

डाळिंबाची देखील अशीच स्थिती आहे. डाळिंबाचे दर ६००० ते ८००० रुपये असे होते. त्यानंतर मात्र दरात घसरण होत ते ३००० ते ५००० रुपये असे झाले. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या केळीचे दर मात्र ४५० ते ५५० क्‍विंटलवर स्थिर आहेत.

मोसंबीला २००० ते २५०० रुपये दर

कळमना बाजारात मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांची आवक गेल्या आठवड्यातील २५० क्‍विंटलवरुन या आठवड्यात ५० क्‍विंटलवर पोचली. आवक कमी झाल्याने दरात तेजी अपेक्षित होती. परंतु दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत घसरले आहेत.

गेल्या आठवड्यात मोसंबीचे व्यवहार प्रतिक्‍विंटल २००० ते ३००० रुपयांनी झाले. या आठवड्यात २००० ते २५०० असा दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT