Pune News: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबांची मदत रोखण्यासाठी कडक उपाय लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू झाल्या आहेत..अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजेच दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य या योजनेसाठी पात्र आहे. त्यामुळे पती व पत्नी यांची दोन ठिकाणी स्वतंत्र शेतजमीन असल्यास दोघांनाही योजनेचा लाभ देता येणार नाही. कारण, जमीन दोन ठिकाणी असली तरी कुटुंब एक असल्यामुळे पती किंवा पत्नीला यातील एकालाच योजनेचे हप्ते मिळायला हवेत..PM Kisan 21st Installment: 'या' दिवशी मिळू शकतात पीएम किसानचे २ हजार रुपये?; २१ व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती.मात्र, देशभर अनेक राज्यांमध्ये एकाच कुटुंबातील दोघांनी योजनेचे अर्ज भरले आहेत. त्यामुळे चुकीने का होईना पण पती व पत्नीदेखील या योजनेचे लाभ घेत आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हा गोंधळ केंद्र शासनाच्या निदर्शनास आला आहे. मात्र, दुहेरी नावे शोधण्यासाठी काही उपाय नव्हता. शेवटी केंद्रानी युक्ती केली. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकांमधील नोंदी तपासण्याचे आदेश केंद्राने दिले..यात शिधापत्रिकांमध्ये पती व पत्नीची एकत्रितपणे नोंद मिळते आहे. आता या नोंदी ‘पीएम किसान’ प्रणालीशी पडताळून पाहिली जात आहेत. यातून एकाच कुटुंबात राहून किती जण दुहेरी लाभ घेत आहेत, हे कळते आहे. त्यामुळे दुहेरी लाभधारक कुटुंबातील कोणाचे तरी एक नाव पुढील हप्त्यासाठी बाद ठरविले जाण्याची शक्यता आहे. अर्थात, केंद्राने याबाबत कुठेही कागदोपत्री आदेश दिलेले नाहीत. नजीकच्या काळात या संदर्भातील निर्णय होऊ शकतात..PM Kisan 21st Installment: पीएम किसानचा २१ वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट, 'या' शेतकऱ्यांना २ हजार मिळणार नाहीत.कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की ‘पीएम किसान’चा दुहेरी लाभ घेणारे हजारो कुटुंब आपल्याही राज्यात आहेत. परंतु, त्यांची संख्या नेमकी किती व त्याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची याविषयी कोणतेही आदेश अजून लागू झालेले नाहीत. माध्यमांमधून राज्यात ५० हजारांहून अधिक कुटुंबातील एकाची मदत रोखली गेल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु, तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही..‘पीएम किसान’चा २१ वा हप्ता आता पुढील काही महिन्यात दिला जाईल. मात्र, त्याअनुषंगाने केंद्राकडून नवा आदेश मिळू शकतो. मात्र, कुटुंबातील पती किंवा पत्नीची मदत राज्यात कुठेही थांबलेली नाही....तर ‘नमो’ची मदतदेखील थांबणार‘पीएम किसान’ योजनेत काही कुटुंबात चुकीने दुहेरी मदत दिली जाते आहे. याच कुटुंबात ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चादेखील दुहेरी लाभ जात आहे. कारण ‘पीएम’चे निकष ‘नमो’ला लावण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्राने कुटुंबातील एकाचा हप्ता बंद केल्यास राज्यात त्याच लाभार्थ्याला ‘नमो’साठी बाद ठरवून त्याचा पुढील हप्तादेखील थांबवला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.