Animal Vaccination Agrowon
ॲग्रो विशेष

Vaccination Animals : परजिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या जनावरांचे लसीकरण सक्तीचे, पशुसंवर्धन विभागाचा निर्णय

Animal Husbandry Department : पशुसंवर्धन विभाग कारखान्यांच्या हद्दीत जाऊन बैलांची तपासणी करणार आहे. परजिल्ह्यातील गोवर्धनीय जनावरांना लसीकरण सक्तीचे केले आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Season : १५ नोव्हेंबरपासून राज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांकडून तयारी केली जात आहे. ऊसतोडीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये परजिल्ह्यातून जनावरांसह मजूर येत असतात. यामुळे लम्पी आजाराचा फैलाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने परजिल्ह्यातील जनावरांना लसीकरण सक्तीचे केले आहे. लसीकरण न करता व बाधित जनावरे आढळल्यास त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपचार केले जाणार आहेत.

ऑगस्ट २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात लम्पी आजाराने राज्यात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात शिरकाव केला. त्यानंतर हळूहळू राज्यभरात या आजाराचा फैलाव वाढत जाऊन जनावरे दगावण्याचे प्रमाणही वाढले होते. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना राबवीत लम्पी आजाराला आटोक्यात आणले होते.

मात्र, मागील दोन महिन्यांपासून लम्पीचा फैलाव वाढला आहे. त्यातच आता ऊसतोडणीचा हंगाम सुरू होणार असल्याने परजिल्ह्यातून ऊसतोड कामगारांच्या बैलजोड्या मोठ्या प्रमाणात येणार आहेत. या बैलांमुळे लम्पी आजार फैलावण्याचा धोका अधिक असल्याने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

पशुसंवर्धन विभाग कारखान्यांच्या हद्दीत जाऊन बैलांची तपासणी करणार आहे. परजिल्ह्यातील गोवर्धनीय जनावरांना लसीकरण सक्तीचे केले आहे. अन्य ठिकाणांहून येणाऱ्या ऊसतोड कामगारांनीही बैलांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. तशा सूचना कारखान्यांनाही दिल्या पाहिजेत, जेणेकरून लम्पीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे.

कारखानास्थळावर तपासणी मोहीम

जनावरांचा लम्पी आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. १५ नोव्हेंबरपासून ऊसतोड हंगाम सुरू होणार असून, ऊसवाहतूक करणाऱ्या बैलजोड्यांची तपासणी सुरू केली आहे. याचबरोबर कारखानास्थळावर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांची तपासणी मोहीम राबविणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberry Cultivation : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून ‘गोकुळ श्री’ स्पर्धा, पहिलं बक्षिस ३५ हजार

Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण

Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Winter Session of Parliament : संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून

SCROLL FOR NEXT