Wheat Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Cultivation : उशिरा गहू लागवडीचे नियोजन

Wheat Sowing : गहू कापूस किंवा मका पिकाच्या काढणीस उशीर झाल्यास बहुतांश शेतकरी गव्हाची उशिरा पेरणी करतात. उशिरा गव्हाच्या लागवडीसाठी शिफारस केलेल्या वाणांची पेरणी केल्यास, अपेक्षित उत्पादन मिळू शकते.

Team Agrowon

Wheat Crop Management : गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. खरीप हंगामात पाऊस लांबल्यामुळे खरिपाची पिके काढणीस विलंब होतो. काही क्षेत्रावर ऊस तोडणीनंतर, तसेच कापूस किंवा मका पिकाच्या काढणीस उशीर झाल्यास बहुतांश शेतकरी गव्हाची उशिरा पेरणी करतात. उशिरा गव्हाच्या लागवडीसाठी शिफारस केलेल्या वाणांची पेरणी केल्यास, अपेक्षित उत्पादन मिळू शकते. त्यासाठी उशिरा पेरणीसाठी शिफारस केलेल्या वाणांची पेरणी करणे अत्यंत गरजेचे ठरते.

जमीन ः

उशिरा पेरणीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. हलक्या जमिनीत गहू लागवड करणे टाळावे.

पूर्वमशागत ः

खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमीन नांगराने १५ ते २० सेंमी खोलवर नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी.

पेरणीची वेळ ः

उशिरा बागायती गव्हाची पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत पूर्ण करावी. त्यानंतर पेरणी केल्यास फायदेशीर ठरत नाही.

बियाणे

उशिरा पेरणीसाठी एकरी ५० किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया ः

  • पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास थायरम (७५ टक्के डब्ल्यूएस) या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

  • मावा, तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (७० डब्ल्यूपी) १७.५ मिलि प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

  • बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून नंतर ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरळविणाऱ्या जिवाणू खतांची प्रत्येकी २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. जिवाणू खतांच्या बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात हेक्टरी १० ते १५ टक्के वाढ मिळण्यास मदत होते.

सिंचन व्यवस्थापन ः

गव्हाची पेरणी केल्यानंतर लगेच शेत ओलवावे. पेरणीनंतर साधारणपणे जमिनीच्या पोतानुसार दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते. पीक वाढीच्या महत्त्वाच्या संवेदनशील अवस्थांमध्ये सिंचन करणे फायदेशीर ठरते.

संवेदनशील अवस्था............. पेरणीनंतरचे दिवस

मुकुट मुळे फुटण्याची अवस्था ..............१८ ते २०

कांडी धरण्याची अवस्था................... ४५ ते ५०

फुलोरा अवस्था.................६० ते ६५

दाण्यात दुधाळ चीक अवस्था............... ८० ते ८५

दाणे भरण्याची अवस्था.................. ९० ते १००

सिंचन करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यास, खालीलप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

  • गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.

  • गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

  • पेरणीनंतर तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी, तर तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

आंतरमशागत ः

गहू पिकामध्ये चांदवेल, हराळी यांसारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता आवश्यकतेनुसार एक किंवा दोन वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करून घ्यावी. आंतरमशागतीच्या कामांमुळे तणांचा बंदोबस्त होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

डॉ. योगेश पाटील, ९४२१८८६४७४ (जिल्हा विस्तार केंद्र, कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

Tur Pest : तुरीवर अळीचे आक्रमण; वातावरण बदलाचा फटका

Elephant Rampage : जंगली हत्तींचा शेतशिवारात धुमाकूळ

Sugarcane Harvester : चांगतपुरी गावची पंजाब आणि हरियानाशी स्पर्धा

SCROLL FOR NEXT