Malegaon Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon Yatra : नांदेडमधील प्रसिद्ध माळेगाव यात्रा २९ पासून

Malegaon Famous Fair : दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा २९ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये भरणार आहे. २९ डिसेंबर रोजी देवसवारी आणि पालखी पूजनाने यात्रेची सुरुवात होणार आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा २९ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये भरणार आहे. २९ डिसेंबर रोजी देवसवारी आणि पालखी पूजनाने यात्रेची सुरुवात होणार आहे.

पाच दिवसांमध्ये कृषी व पशुप्रदर्शन, कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार, अश्‍व, श्‍वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धा, कुस्त्यांची दंगल, पारंपरिक लोककला महोत्सव, महिला आरोग्य शिबिर, लावणी महोत्सव होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात माळेगाव यात्रा संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली, त्या वेळी त्यांनी माहिती दिली. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा जाधव-कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

माळेगाव यात्रा यंदाही संस्मरणीय ठरविण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. यंदा अधिक मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या यात्रेचे औचित्य, महत्त्व आणि परंपरेला जोपासण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करणवाल यांनी दिली.

यंदाची यात्रा प्लॅस्टिकमुक्त यात्रा करण्यावर भर असेल. कचरा व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टर, हॉटेल व खाणावळीसाठी डस्टबिन्स ठेवण्यात येतील. मंदिर परिसरात प्लॅस्टिक मुक्तीसाठी जनजागृती आणि महिला बचत गटांकडून कापडी पिशव्यांचे स्टॉल्स उभारले जातील. ॲम्ब्युलन्स आणि रुग्णवाहनासाठी बाइक सेवा सुरू करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. पोलिस प्रशासनाच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. रस्ते मोकळे ठेवून छोटे व्यापारी एकत्रितपणे ठरावीक जागेवर दुकाने लावू शकतील, असे जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे.

जिल्हा परिषदेने महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, अग्निशमन, राज्य उत्पादन शुल्क, बीसएसएनएल, राज्य परिवहन महामंडळ, देवस्थान समिती आणि अन्य विभागांच्या समन्वयाने यात्रा यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले.

माळेगाव यात्रेतील पाच दिवसांचे कार्यक्रम

२९ डिसेंबर : देवसवारी आणि पालखी पूजन, महिला व बालक स्पर्धा, भव्य कृषी व पशुप्रदर्शन, कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार.

३० डिसेंबर : अश्‍व, श्‍वान, कुक्कुट प्रदर्शन, स्पर्धा, महिला आरोग्य शिबिर.

३१ डिसेंबर : कुस्त्यांची दंगल.

१ जानेवारी : पारंपरिक लोककला महोत्सव.

२ जानेवारी : लावणी महोत्सव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT