Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season Management : गावनिहाय आराखडे करून खरिपाचे नियोजन करा

शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने प्रत्येक गावामध्ये ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठका घ्याव्यात.

Team Agrowon

Parbhani News : शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम (Kharif Season) अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने प्रत्येक गावामध्ये ग्राम कृषी विकास समित्यांच्या बैठका घ्याव्यात. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी गावनिहाय कृषी आराखडे तत्काळ तयार करावेत.

सोयाबीनची उत्पादकता वाढीसाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी किंवा टोकन पद्धतीने लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये करावा.

पीक पेरणीचे वस्तुनिष्ठ आकडेवारी संकलित करून अहवाल तयार करण्याची गरज आहे. ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यावर भर द्यावा, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये परभणी जिल्हा खरीप हंगाम २०२३ पूर्व तयारी कार्यशाळा सोमवारी (ता. २४) आयोजित करण्यात आली होती.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे, लातूर कृषी विभाग सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी आर. बी. हरणे, वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठातील विस्तार कृषीविद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत भोसले, तंत्राधिकारी बी. बी. वीर, डॉ. संदीप जगताप, तालुका कृषी अधिकारी एस. पी. काळे (जिंतूर), प्रदीप कच्छवे (मानवत), गणेश कोरेवाड (सोनपेठ), प्रभाकर बनसावडे (गंगाखेड), आबासाहेब देशमुख (पालम) आदी उपस्थित होते.

डॉ. गडदे म्हणाले, की सोयाबीन, कपाशीच्या उत्पादकता वाढीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणांची निवड करावी. बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. डॉ. पटाईत म्हणाले, की किडींच्या प्राद्रुर्भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिकांचा फेरपालट करावा. दोन-तीन वर्षांतून एकदा खोल नागरंट करावी.

डॉ. भोसले म्हणाले, की कृषी विद्यापीठातील संशोधन शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात कृषी विस्तार कर्मचाऱ्यांची भूमिका अंत्यत महत्त्वाची आहे. लोखंडे म्हणाले, की सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांचे काटेकोर नियोजन करावे.

सोयाबीनचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरचे बियाणे वापरावे. उगवशक्ती चाचणी घेऊन पेरणी करावी. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनावर भर द्यावा. तीर्थकर म्हणाले, की मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकण्यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अमंलबजावणी करून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहावे.

दहा वर्षांच्या आतील वाणांच्या बीजोत्पादनावर भर द्यावा. सोयाबीनमध्ये उत्पादकता वाढीसाठी रुंद वरंब सरी (बीबीएफ) किंवा टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी. चव्हाण म्हणाले, की ‘आत्मा’मार्फत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणे तसेच अभ्यास सहलींसाठी पुढाकार घेतला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT