Vidhansabha Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhansabha Election 2024 : मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा

Election 2024 : जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही यांची मतदारांनी खात्री करावी. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये नाव नोंदविले नाही, त्यांनी आपले संबंधित मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसील कार्यालय येथे संपर्क साधून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

एक जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३० ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करावी. मतदानाच्या दिवशी मतदार यादीतील नावाबाबत संभ्रम व नाव नसल्याने मतदानापासून वंचित राहण्यासारखा तक्रारी मोठ्या प्रमाणात होतात. यासाठी मतदार यादी व मतदान केंद्राबाबत सर्व नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे.

सदर निवडणुकांमध्ये मताधिकार बजाविण्यासाठी ही महत्त्वाची संधी असून, नाव नसलेल्या मतदारांनी आपले नाव नोंदणी करावी. नोंदणीसाठी ऑनलाइन Voter helpline app किंवा voters. eci.gov.in यावर देखील आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करू शकतात. तसेच आपले मतदार यादीतील नाव व आपले मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा आपले संबंधित तहसील कार्यालयास संपर्क साधू शकतात. नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक १९५० कार्यान्वित करण्यात आलेला आहे.

समाजातील सर्व स्तरामध्ये मागास वंचित घटक, दिव्यांगासह सर्वाचा समावेश मतदार यादीमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ज्या युवक-युवती, महिला यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदविले नाही, त्यांनी आपले संबंधित मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO), संबंधित तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT