MLA Shweta Mahale Agrowon
ॲग्रो विशेष

MLA Shweta Mahale : शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरीप नियोजन करा : आ. श्‍वेता महाले

Kharif Season : शेतात भरघोस पीक उत्पादन झाले तरच शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येईल व यातून अर्थचक्र गतिमान होईल.

Team Agrowon

Buldana News : शेतात भरघोस पीक उत्पादन झाले तरच शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येईल व यातून अर्थचक्र गतिमान होईल. यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी शेती व शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन करावे, असे निर्देश आमदार श्वेता महाले यांनी दिले. धाड येथे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीबद्दल आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

बैठकीत आ. महाले यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित बुलडाणा तालुक्यातील शासकीय विभागातील अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत झालेल्या तयारीची माहिती घेतली.

बैठकीत बुलडाणा कृषी बाजार समितीचे संचालक देविदास पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव चव्हाण, कनिष्ठ अभियंता मनोज देठे, नायब तहसीलदार श्री. पवार कृषी अधिकारी प्रीती पाटील तसेच परिसरातील कृषी निविष्ठा विक्रेते, मंडळ कृषी अधिकारी दीपक लोखंडे, संदीप सोनवणे, दिनकर सोनुने, सुभाष जाधव, आशिष पडवळ, संतोष वारे, संजय खंदारे, संजय सुसर, शालीकराम गवते, गणेश धंदर, रवींद्र जोशी, अरुण धंदर, गजानन जाधव, विलास पालकर, भगवान पिंपळे, सागर जाधव, महादेव पडोळे, गजानन धंदर, राजीव आढाव उपस्थित होते.

या बैठकीत आ. महाले यांनी धाड परिसरातील खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी प्रत्येक मंडळामध्ये शेतकऱ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करावे तसेच गावोगावी दवंडी देत शासनाच्या कृषी विषयक योजनांची माहिती गावकऱ्यांना द्यावी अशी सूचना त्यांनी केली. म्हसला बुद्रुक येथील हवामान केंद्र बंद पडले असून ते त्वरित सुरू करावे असेही निर्देश त्यांनी दिले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT