Mahad News : कोकण विभागामध्ये रायगड जिल्ह्यात भात पीक स्पर्धा (Paddy Crop Competition) आयोजित केली होती. त्यात महाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्पर्धेत बाजी मारली.
भात पीक स्पर्धेमध्ये महाड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांची निवड झाली असून जिल्हा स्तरावर सुनील पांडुरंग बोरेकर (रा. ताम्हाणे)प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
त्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली प्रमाणित रत्नागिरी ८ या वाणाची लागवड केली तसेच त्यांनी प्रती गुंठा १३७ किलो भाताचे उत्पादन घेऊन रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक किशोर फाळके (शिरवली) यांना मिळाला आहे. त्यांनीही रत्नागिरी आठ या वाणाची लागवड केली तसेच १०५ किलो प्रति गुंठा उत्पादन घेतले.
तालुकास्तरावर सुदाम सकपाळ (राजिवली) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी वाडा कोलम वाणाची लागवड करून प्रती गुंठा ८१ किलो उत्पादन घेतले.
कृषी अधिकारी लक्ष्मण कोतवाल, मंडळ अधिकारी भरत कदम, कृषी पर्यवेक्षक तानाजी जगदाळे, कृषी सहायक उदय लेंगरे, सागर गव्हाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.