River Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

River Conservation : नागपूर विभागातील १३ नद्यांचा सर्वंकष आराखडा बनवा

Team Agrowon

Nagpur News : ‘‘विभागातील १३ नद्यांचा ‘अमृत वाहिनी’ म्हणून विकास करण्यात येणार आहे. त्याकरिता नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करावा,’’ असे निर्देश विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाचा जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा (नागपूर), विवेक जॉनसन (चंद्रपूर), एस. एम. कुर्तकोटी (भंडारा), अभियानाचे राज्य समन्वयक रमाकांत कुळकर्णी, जल बिरादरीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र चुघ, डॉ. प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी नोडल अधिकारी तसेच नदी प्रहरी यांच्या माध्यमातून नदी प्रवाह पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना सूचवायच्या आहेत. त्याद्वारे प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी व पावसाळ्यापूर्वी या अभियाना अंतर्गत निवडण्यात आलेली कामे पूर्ण करावीत, अशा सूचना बिदरी यांनी दिल्या.

अमृत वाहिनी तयार करण्याच्या कामाला विभागात चांगली सुरवात झाली आहे. वर्धा, गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांबद्दल राजेंद्र सिंह यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘उगमस्थान ते संगमापर्यंत या नद्यांच्या पात्रांचा महसूल विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार आराखडा तयार करावा.

नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा ठरणारे अतिक्रमण काढावे. तसेच नदीप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. संपूर्ण नदीचा विकास करताना शासनाच्या विविध योजनांद्वारे खोलीकरण, रुंदीकरण, गावातील सांडपणी व घनकचरा व्यवस्थापन आदी बाबींवर उपाययोजना कराव्यात. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने नदी स्वच्छतेसाठी वृक्षारोपण करावे. नद्यांच्या पात्रात नवीन बांधकाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी.’’

...या नद्यांचा समावेश

नागपूर जिल्ह्यातील नाग नदी ५६ किमी, साधुखोरा (आंब) नदी २५.५ किमी, गोंदिया जिल्ह्यातील चूलबंद नदी २८ किमी, चंद्रपूरमधील उमानदी १३० किमी, इरई नदी १०४ किमी, गडचिरोलीतील खोब्रागडी नदी ८१ किमी, कठाणी नदी ७० किमी, पोहरा/ पोपखोडी नदी ५४ किमी, वर्धा जिल्ह्यातील धाम नदी ८६ किमी, वेना नदी ८६ किमी, यशोदा नदी ४४५ किमी तर भंडारा जिल्ह्यातील चूलबंद ववैनगंगा नदीचा या उपक्रमात समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT