River Conservation : ‘चला जाणूया नदीला’तील कामांचा अहवाल तयार करा

River Campaign : चला जाणूया नदीला’ उपक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांवर आधारित एकत्रित अहवाल तयार करावा.
River
River Agrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘‘चला जाणूया नदीला’ उपक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांवर आधारित एकत्रित अहवाल तयार करावा. उपक्रमातील लोकसहभाग वाढविण्यावर भर द्यावा,’’ असे आवाहन वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी केले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीत गुरुवारी (ता. ३१) रेड्डी बोलत होते. या वेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, डॉ. राजेश देशमुख, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चावरे, डॉ. सुमंत पांडे, नरेंद्र चुग, पुणे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

River
River Conservation : नद्या वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ आवश्यक

श्री. रेड्डी म्हणाले, ‘‘राज्यातील प्रत्येक नदीशी जोडलेले विषय वेगळे असतील. त्यामुळे उपक्रमाची एक निश्चित कार्यपद्धती ठरवून जनजागृतीच्या उपाययोजना ठरवाव्यात. नदी संरक्षण आणि नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी संबंधित घटकांसोबत चर्चासत्राचे आयोजन करावे. त्यातून समोर आलेल्या मुद्यांच्या आधारे कार्यपद्धती निश्चित करावी.

लोकसहभाग वाढविताना जनजागृतीसाठी समाज माध्यमांचा वापर करावा. त्यावरून चांगले संदेश आणि होणाऱ्या कामांची माहिती प्रसारित करावी. झालेल्या कामावर आधारित एकत्रित अहवाल तयार करावा आणि लोकसहभाग वाढविण्यासाठीच्या उपक्रमांवर विचार करावा.’’

राव म्हणाले, ‘‘प्रदूषण कमी करणे, सुशोभीकरण आणि पूर नियंत्रण अशा तीन पातळीवर पुणे विभागात उपक्रम राबविण्यात येत आहेत. विभागातील २० नद्यांची प्राथमिकरित्या निवड केली आहे. ‘नमामी चंद्रभागा’सारख्या उपक्रमाद्वारे नदी पात्रांचा विकास करण्यासाठी काम करण्यात येत आहे.

River
Panchganga River : प्रदूषणमुक्त ‘पंचगंगे’साठी शासन ठोस उपक्रम हाती घेणार ः अजित पवार

पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील प्रदूषित पाणी नदीत जाऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीतील सांडपाण्याचे ऑडिट करण्यात येऊन शुद्धीकरणात असलेली तूट भरून काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

त्यासाठी विविध योजनांद्वारे निधी देण्यात येत आहे. पुण्यात ‘जायका’ योजनेद्वारे सांडपाणी शुद्धीकरणाचे काम करण्यात येईल. राम नदीसारख्या महत्त्वाच्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि शहरातील नदीकाठी अनधिकृत पद्धतीने कचरा टाकणे बंद व्हावे म्हणून उपाय करण्यात आले आहेत.’’

डॉ. देशमुख म्हणाले, ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामाजिक संस्थांच्या सहकार्याने काम सुरू केले आहे. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. पुणे महापालिका शिक्षण, खनिकर्म विभाग आणि जलसंपदा विभागाने नदीनिहाय समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

जिल्ह्यातील पाच नद्यांचे सर्वेक्षणही केले आहे. जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण योजनेतून अपेक्षित उपाययोजनांना निधी देण्यात येईल. इंद्रायणी नदी शुद्धीकरणासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचनांनुसार उपाययोजनांवर लक्ष देण्यात येत आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com