Banana Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Insurance: फळ पीकविमा योजनेत नियमबाह्य सहभागावर कारवाई

Agriculture News: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून केळी पिकासंबंधी जिल्ह्यात विमा संरक्षण घेतले जात आहे. यात नियमबाह्यपणे या योजनेत केळी पिकास विमा संरक्षण घेतल्यासंबंधी थेट कारवाईसत्र राबविले जात आहे.

Team Agrowon

Jalgaon News: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून केळी पिकासंबंधी जिल्ह्यात विमा संरक्षण घेतले जात आहे. यात नियमबाह्यपणे या योजनेत  केळी पिकास विमा संरक्षण घेतल्यासंबंधी थेट कारवाईसत्र राबविले जात आहे. शेतात प्रत्यक्ष जाऊन केळी पीक पाहणी व करारनाम्यांबाबत विशेष खबरदारी विमा कंपनीसह कृषी विभागाने केली. त्यात सुमारे ७३३ विमा प्रस्ताव बोगस आढळले. 

तसेच सुमारे तीन हजारांवर विमा प्रस्तावासंबंधी पडताळणीच शेतकऱ्यांनी करून घेतलेली नाही. यामुळे हे प्रस्तावदेखील मार्गी लागतील की नाही, असा मुद्दा आहे. फळ पीकविमा योजनेत जिल्ह्यातून केळी पिकासाठी विमा संरक्षण अन्य फळ पिकांच्या तुलनेत अधिक असते. परंतु या योजनेत अनेकदा नियमबाह्य सहभागाच्या तक्रारी व त्यामुळे घोळ वाढल्याचाही प्रकार झाला.

यंदा भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी) यासंबंधीचे काम जिल्ह्यात करीत आहे. मागील हंगामात जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. यंदाही केळी पिकासाठी या योजनेतून विमा संरक्षण मिळाले आहे.

या योजनेत लीजवर शेती घेऊन त्यात केळी लागवड करणारे शेतकरीदेखील केळी पिकास विमा संरक्षण घेवू शकतात. परंतु यासाठी नोंदणीकृत (रजिस्ट्रार) करारपत्र आवश्यक आहे. या करारपत्राशिवाय योजनेत सहभाग घेता येत नाही. या करारपत्रासंबंधीच्या विमा योजनेतील सहभागाबाबत विशेष लक्ष आहे. त्यााबाबत कसून चौकशी व पडताळणी केली जात आहे. 

सहभागानंतर जिओ टॅगिंग

विमा योजनेत केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच काही वेळेस कृषी विभागाचे कर्मचारी थेट संबंधित क्षेत्रात जाऊन केळीची लागवड केली आहे का, जेवढी लागवड केली आहे, तेवढ्याच क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेतले आहे का, केळी बाग उत्पादनक्षम आहे का, याची तपासणी करीत होते.  त्यासाठी शासनाकडून प्राप्त माहिती, नकाशा आदी बाबी जुळवून जिओ टॅगिंग करून घेतली जात आहे.

यात केळी न लागवड करताच विमा संरक्षण घेतल्याने ७३३ विमा प्रस्ताव रद्द झाले आहेत. सुमारे तीन हजार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केळीची लागवड आहे की नाही, याची पडताळणीच करून घेतली नाही. यासंबंधीची अंतिम कारवाई कृषी विभागातील वरिष्ठ कार्यालयातर्फे केली जाणार आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: 'लाडकी बहीण' योजनेसारखा 'कर्जमाफी'चा खेळ मांडू नका; राजू शेट्टींचा इशारा

Maharashtra Farmers: खरीप पीककर्जाच्या उद्दिष्टात ५०.२३ कोटींची वाढ

Agrowon Podcast: सोयाबीन स्थिरावले; कापूस आवक कमीच, कांदा आज टिकून, टोमॅटो भावात सुधारणा तर तुरीची आवक कमीच

Parbhani Agriculture Update: परभणी जिल्ह्यात भुईमूग, मूग, बाजरी, मक्याच्या पेरणीत वाढ

Storm Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT