District Collector Reviews Water Conservation Works: जलयुक्त शिवार २.० अभियानांतर्गत मंजूर सर्व कामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निश्चित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कामांना गती द्यावी. तसेच प्रत्येक कामाचे जिओटॅगिंग करून त्याची टप्प्याटप्प्याने नोंद ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले..जलयुक्त शिवार २.० अभियान, गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते..Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात.यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्याम फेरवाणी, सहायक अभियंता अपूर्वा नानोटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते..बैठकीत विविध विभागांनी मंजूर कामांची सद्यस्थिती, कार्यारंभ आदेश, तांत्रिक मान्यता, निधी उपलब्धता आणि पुढील नियोजनाची माहिती सादर केली. जलयुक्त शिवार २.० अंतर्गत मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ठिकाणी कार्यारंभ आदेश देणे, निविदा प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करणे आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या..Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ ठप्प; ४०० कोटींची गरज.गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. निधी उपलब्धता आणि विविध यंत्रणांमधील समन्वयातून कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला..जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी प्रत्येक जलसंधारण कामाचे जिओपोर्टलवर जिओटॅगिंग करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. काम सुरू होण्यापूर्वीची, काम सुरू असतानाची आणि पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रांसह अचूक नोंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत तांत्रिक संमतीसाठी आवश्यक प्रस्ताव ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.