maize sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Sowing : मका लागवड रखडत सुरू

Team Agrowon

Jalgaon News : कमी दर, रोगराई आटोक्यात आणण्यासंबंधीचा मोठा खर्च यामुळे मका पिकाच्या लागवडीबाबत खानदेशात शेतकऱ्यांमध्ये उत्साह कमी आहे. सध्या उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात दादर ज्वारी, हरभरा लागवड सुरू आहे. अल्प शेतकरी मक्याची लागवड करीत आहेत.

ज्यांनी खरिपात मक्याची लागवड केली होती, त्या शेतकऱ्यांनी मका लागवड टाळली आहे. मक्याचे दर बाजारात हवे तसे नाहीत. मागील दोन-तीन दिवसात दरात सुधारणा झाली आहे. परंतु रब्बीमधील मका पिकास पाणी अधिक लागते. खानदेशात पावसाची तूट राहिली आहे. धुळे, नंदुरबारात २० टक्के तर जळगावातही सुमारे १० टक्के तूट राहिली आहे.

परतीचा पाऊस न आल्याने विहिरी, कूपनलिकांना पाणी कमी आहे. यामुळे मुरमाड, हलके क्षेत्र आणि आवर्षणप्रवण भागात मक्याची लागवड होत नसल्याचे चित्र आहे. आजघडीला जळगाव जिल्ह्यात एक हजार हेक्टरवरदेखील मक्याची रब्बीसंबंधी लागवड झालेली नाही. रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

या भागात जुनारी किंवा काढणी ९५ टक्के पूर्ण झालेल्या केळी बागांत मका पिकाची लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, जामनेर, जळगाव या भागात मका लागवडीकडे फारसा शेतकऱ्यांचा कल नाही. धुळ्यातही साक्री, शिंदखेडा भागात कमी पाऊस असल्याने लागवड घटणार आहे.

नंदुरबारातही शहादा, तळोदा वगळता इतर भागात मका लागवड अल्प राहील, असेही चित्र आहे. खानदेशात रब्बीमध्ये सुमारे ४२ ते ४५ हजार हेक्टरवर मका लागवडीचा अंदाज असतो. परंतु एवढी लागवड यंदा होणार नाही, असे चित्र आहे.

तूर्त मक्याची लागवड खानदेशात अल्प दिसत आहे. सध्या कापूस पिकात वेचणी सुरू आहे. ही वेचणी आणखी महिनाभरात एक किंवा दोनदा होईल. यानंतर पीक काढले जाईल. त्यामुळे डिसेंबरमध्ये मका लागवड खानदेशात वाढेल, अशी माहिती मिळाली.

बियाणेही महाग

मक्याचे बियाणेदेखील महागले आहे. काही कंपन्यांचे वाण १६०० रुपये प्रतिबॅग (चार किलो) या दरात उपलब्ध आहेत. त्यांची कृत्रीम टंचाईदेखील काही शहरांत सध्या आहे. दुसरीकडे मका पिकात अमेरिकन लष्करी अळी दोन-तीन फवारण्या घेऊनही आटोक्यात येत नाही. तसेच सिंचनासाठी सहा वेळेस पाट पद्धतीने पाणी द्यावे लागते. किमान साडेचार महिने कालावधी उत्पादन हाती येण्यासाठी लागतो. यामुळे अनेक शेतकरी मक्याऐवजी ज्वारी, हरभरा व इतर पिकांना पसंती देत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT