Maize Market : खानदेशातील बाजारांत मका आवकेत वाढ

Maize Rate : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत मक्याची आवक वाढली आहे. सध्या प्रतिदिन सरासरी सहा हजार क्विंटलपेक्षा अधिकची आवक जळगावातील प्रमुख तीन बाजार समित्यांत होत आहे.
Maize Market
Maize MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत मक्याची आवक वाढली आहे. सध्या प्रतिदिन सरासरी सहा हजार क्विंटलपेक्षा अधिकची आवक जळगावातील प्रमुख तीन बाजार समित्यांत होत आहे. दर १५०० ते २००० रुपये व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे.

चोपडा, जळगाव, अमळनेर, चाळीसगाव या जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्या मक्यासाठी प्रसिद्ध आहेत. धुळ्यात शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा, नंदुरबारात शहादा, तळोदा व नंदुरबार या बाजार समित्यांतही मक्याची अधिकची किंवा बऱ्यापैकी आवक होत असते. खरिपातील मक्याची आवक जळगाव, चोपडा, नंदुरबार या बाजार समित्यांत अधिक असते.

Maize Market
Khandesh Maize Market : खानदेशात मका आवक सुरू

चोपडा येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. २६) ३१०० क्विंटल मक्याची आवक झाली. एवढीच आवक जळगाव बाजार समितीतही झाली. चोपडा येथील बाजार समितीत मक्यास गुरुवारी किमान १६६२, कमाल २०४२ व सरासरी १८११ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जळगावातही किमान १५०० व कमाल २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

नंदुरबार, शहादा येथेही मक्याची कमाल दरपातळी २०५० रुपयांखालीच राहीली आहे. तर किमान दर मात्र १२०० रुपयांवरून १४०० ते १५००, १६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. कमाल किंवा २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर अल्प शेतकऱ्यांच्या मक्यास मिळत आहे. कमाल शेतकऱ्यांना १५०० ते १६००, १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

Maize Market
Maize Cultivation : रब्बी मका लागवडीचे तंत्र

मागील काही दिवस पाऊस नाही. किंवा वातावरणातील आर्द्रताही कमी झाली आहे. आर्द्रता कमी झाल्याने व कोरड्या वातावरणामुळे मका मळणीस वेग आला आहे. मध्यंतरी दर १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. कमी दरांमुळे अनेकांनी मका मळणी टाळली होती. तसेच मळणी केलेला मका घरात साठविला होता. परंतु मागील दोन ते तीन दिवसांत काही भागांत दरात सुधारणा झाली आहे.

यामुळे मक्याची आवकही वाढली आहे. जळगाव बाजार समितीमध्ये आवक पुढे आणखी वाढणार आहे. कारण बाजार समितीच्या क्षेत्रात मक्याची लागवड अधिक होती. तसेच जामनेर, छत्रपती संभाजीनगरातूनही मक्याची आवक जळगाव बाजार समितीत होत आहे.

अमळनेरातही मक्याची आवक टिकून आहे. जळगावपाठोपाठ चोपडा येथील बाजारातही मक्याची आवक बऱ्यापैकी आहे. दुष्काळी स्थितीमुळे चाळीसगाव, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबार बाजार समित्यांतील मक्याची आवक कमी आहे, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com