Maize Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Cultivation: मका पिकाची ६० टक्के क्षेत्रांवर लागवड

Maize Farming: जिल्ह्यात खरिपाची वेगवेगळी १२ प्रमुख पिके घेतली जातात. मात्र यातून सर्व पिकांना मागे टाकत मका पिकाने पेरणीचा उच्चांक गाठला आहे.

Team Agrowon

Yevala News: जिल्ह्यात खरिपाची वेगवेगळी १२ प्रमुख पिके घेतली जातात. मात्र यातून सर्व पिकांना मागे टाकत मका पिकाने पेरणीचा उच्चांक गाठला आहे. अद्याप पेरणी सुरू असतानाच तब्बल २ लाख ८८ हजार हेक्टरवर मका पीक घेतले असून या पिकासाठी ६० टक्के क्षेत्र शेतकऱ्यांनी गुंतवले आहेत.

आतापर्यंत ७७ टक्के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. मात्र आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने आता जिल्ह्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.कमी उत्पादन खर्च आणि हक्काचे उत्पन्न देणारे पीक ठरत असल्याने मागील ८-१० वर्षापासून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक क्षेत्र घेतल्या जाणाऱ्या मक्याच्या लागवडीत यंदाही जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

यावर्षी चांगला पाऊस आणि कांद्याचे बाजारभाव टिकून असल्याने पीक पॅटर्नमध्ये बदल झाल्याचे दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर बाजरी व मुगाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे.हे पीक काढून लाल कांदा लागवडीचे नियोजन आहे.मका हे जिल्ह्याचे प्रमुख पीक बनत असल्याने सुमारे १२२ टक्के मकाची पेरणी झाली आहे.

मक्यावर लष्करी आळी तसेच रोजच्या ढगाळ वातावरणाने पेरणी झालेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातच फवारणीवर खर्च करण्याची वेळ आली मात्र बहुतांशी शेतकऱ्यांनी रोगाचे नियंत्रण केले आहे.

नाशिक, सुरगाणा, दिंडोरी, पेठ, कळवण या तालुक्यात पेरणी अद्याप ५० टक्क्यांच्या आतच आहे तर मालेगाव, बागलाण, नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड भागातील पेरण्या उरकल्यात आहेत. जिल्ह्यात ६ लाख ४० हजार ५५१ हेक्टरवर पेरणी अपेक्षित असून ४ लाख ९१ हजार ६८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

यंदा वेळेत पेरणी झाली असून पिके जोमात आहेत. पूर्व भागात पावसाची पिकांना गरज आहे. काही ठिकाणी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत असला तरी प्रमाण कमी आहे, याबाबत कृषी विभागाचा सल्ला घेऊन फवारण्या कराव्यात.
- साईनाथ कालेकर,  कृषी सहाय्यक, येवला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Paddy Procurement: चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित

Pomegranate Orchard Damage: वादळी वाऱ्यासह गारपीट; डाळिंब बागांचे नुकसान

Declining Water Storage: लघु प्रकल्पात १८ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा

Tractor Cultivation Charges Hike: शेती मशागतीचे दर २०० रुपयांनी वाढले

Drip Irrigation Project: ढिवरवाडी सिट्रस इस्टेटमध्ये अखेर लागणार ड्रीप

SCROLL FOR NEXT