Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Kharif Sowing : शिराळ्यात खरीप पेरणी ३२ टक्के

Kharif Season : शिराळा तालुक्यात ३२ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. भात पेरणी ३२.२५, तर एकूण खरीप पेरणी ३१.५६ टक्के झाली.
Published on

Sangli News : शिराळा तालुक्यात ३२ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. भात पेरणी ३२.२५, तर एकूण खरीप पेरणी ३१.५६ टक्के झाली. आता होणारी भात पेरणी केवळ रोप लावणीवर अवलंबून आहे.

तालुक्यात चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने ओढ्याकाठी अथवा ओघळीच्या पाण्यावर सायपन पद्धत अथवा डिझेल इंजिनद्वारे कोरड्या शेतात पाणी सोडून रोप लावणीची कामे पश्चिम भागात सुरू आहेत. जेथे पाण्याची सोय नाही, अशा ठिकाणी रोपं लावण्याची कामे खोळंबली आहेत.

Kharif Sowing
Kharif Sowing : शहादा तालुक्यात खरिपाची ९० टक्के पेरणी

काही ठिकाणी रोपांचा तुटवडा भासू लागल्याने वाळवा तालुक्यातील काही गावांतून रोपे आणून लावण केली जात आहे. यावर्षी १२ मेपासून मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. ८० टक्के धूळवाफ पेरण्या झाल्याच नाहीत. मे आणि जूनमध्ये पाऊस सुरू राहिल्याने रोप लावणीसाठी तरवे टाकता आले नाही.

तरवे टाकले त्यांच्या शेतात पाणी साचून राहिल्याने कुजले. त्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली. ज्या ठिकाणी धूळवाफ पेरण्या झाल्या नाहीत, त्या ठिकाणी रोप लावण करावी लागणार आहे. त्यासाठी रोपे उपलब्ध झाली नाहीत.

Kharif Sowing
Kharif Sowing : मूग, उडीद, तुरीच्या पेरण क्षेत्रात घट

आता रोपे उपलब्ध झाली आहेत. पाऊस नसल्याने चिखल करणारे शक्य नाही. ज्या शेताजवळ ओढ्या-ओघळीचे पाणी आहे, अशा ठिकाणी डिझेल इंजिनच्या माध्यमातून शेतात पाणी सोडून रोपे लावली जात आहेत.

ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही, त्या शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. तालुक्यात चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. कोळपणी, भांगलणीला गती आली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी साचले नसल्याने रोप लावण खोळंबली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com