Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : सर्वसामान्यांच्या हितासाठी महायुतीचे काम : अजित पवार

Team Agrowon

Nagar News : माझी लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज, विद्यार्थ्यांना मानधन, मुलींचे मोफत शिक्षण, मौलाना महामंडळाला निधी अशा विविध योजना महायुती सरकार सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून राज्यात काम करत आहे. सरकार राबवत असलेल्या योजना पुढे कायम चालू ठेवण्यासाठी केंद्राच्या विचाराचे सरकार राज्यात देखील आवश्यक आहे, त्यासाठी विधानसभेला महायुतीचा पुन्हा आपल्याला आमदार करायचा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

कोपरगाव (जि. नगर) येथे शनिवारी (ता. १०) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर, मंत्री अनिल पाटील, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, की माझी लाडकी बहीण योजनेतून वर्षाला कोपरगावातील ६० हजार बहिणींना तब्बल १०८ कोटी रुपये मिळणार आहे. त्यातून बाजारपेठेला निश्‍चित चालना मिळेल. कोपरगावचे जे काही प्रलंबित प्रश्‍न आहेत ते सोडविण्याचा शब्द देतो, पूर्ण जबाबदारी घेतो. त्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत कोपरगावमधून महायुतीचा जो उमेदवार विजयी करायचा आहे.

राज्यात केंद्रातील विचाराचे सरकार आले, तर निधीत झुकते माप मिळते. लोकसभेला संविधान बदलणार नाही, आरक्षण जाणार नाही, समान नागरी कायदा येणार नाही, असे आम्ही सांगत होतो. आम्ही पाठीशी उभे राहणारे आहोत. लोकांनी अजिबात काळजी करू नये. राज्याच्या विकासासाठी आम्ही महायुती सरकारमध्ये सामील झालो. सरकारमध्ये नसतो, तर कोपरगावात ३००० कोटींची कामे झाली नसती.

उमेदवार कोण असेल याकडे लक्ष

कोपरगाव विधानसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे आमदार आहे. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला होता. आता राष्ट्रवादी महायुतीत आहेत. कोल्हे कुटुंबातील विवेक कोल्हे जिल्हा बॅंकेत संचालक आहेत. विवेक कोल्हे यांचा नुकत्याच झालेल्या नाशिक शिक्षक मतदार संघात निसटता पराभव झालेला आहे. कालच्या सभेत अजित पवार यांनी महायुतीचा उमेदवार विजयी करायचा असल्याचे सांगताना उमेदवाराचे नाव सांगितले नाही, मात्र तुमच्या मनात आहे तेच होईल, असे सूचक वक्तव्य केले. कोल्हे कुटुंबही विधानसभा लढवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे कोपरगात महायुतीचा उमेदवार कोण असेल याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT