Agriculture Transformer Agrowon
ॲग्रो विशेष

Mahavitaran Electricity : ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीसाठी महावितरणच्या ॲपवर सुविधा

Agriculture Transformer : ट्रान्स्फॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास त्या जागी तातडीने दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसवण्यासाठी आता महावितरणने ॲप सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

Team Agrowon

Nagar News : ट्रान्स्फॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास त्या जागी तातडीने दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसवण्यासाठी आता महावितरणने ॲप सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे ग्राहकांचे काम हलके होणार असून ग्राहकांनी या ॲपचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

ग्रामीण भागात विजेचे ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रमाण घडते. ट्रान्सफार्मर जळाले तर ते लवकर दुरुस्त केले जात नाही. मात्र आता त्यासाठी महावितरण नवे प्रयोग करत आहे. ट्रान्सफार्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲपचा वापर करुन महावितरणने राज्यभर करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार राज्यात सध्या याबाबत मोहीम सुरू आहे. ट्रान्सफार्मर जळाले अथवा खराब झाल्याची खबर मिळाल्यानंतर जास्तीत जास्त तीन दिवसांत बिघडलेला ट्रान्स्फॉर्मर बदलला जात आहे. तथापि, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मरबद्दल माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने ग्राहकांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी महावितरणच्या मोबाइल ॲपवरील सुविधा वापरणे ग्राहकांसाठी सोपे ठरू शकते.

जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने ट्रान्स्फॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्स्फॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्स्फॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेण्यात येतो.

या मोहिमेला यश आले असून महावितरणला ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसांत ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि, ट्रान्स्फॉर्मर जळाला आहे, हेच उशिराने समजले तर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे ॲपचा वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

ॲपवरून तक्रार अशी करा

- मोबाइलवर महावितरण हे ॲप उघडा

- नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा या बटणावर क्लिक करा

- ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर क्लिक करा-ट्रान्स्फॉर्मरजवळची खूण कोणती आहे, कधीपासून ट्रान्स्फॉर्मर बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा

- संबंधित ट्रान्स्फॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा- नोंद करा किंवा सबमिट हे बटण दाबा

- ट्रान्स्फॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्वरमध्ये होईल. तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल

- ट्रान्स्फॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाईल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rainfall 2025: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज; विदर्भात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

AI In Sugarcane Farming : ‘एआय’च्या वापरासाठी ऊस उत्पादक शेतकरी आले पुढे

Sugarcane Farming : ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे

Pasha Patel: शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घेतली पाहिजे; पाशा पटेल यांचा अजब सल्ला

Dairy Farming : दुग्ध व प्रक्रिया व्यवसायातून शोधला आनंद

SCROLL FOR NEXT