MSEDCL  Agrowon
ॲग्रो विशेष

MSEDCL Abhay Yojana: महावितरणची अभय योजनेची मुदत मार्च अखेरपर्यंतच

Mahadiscom Scheme: महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत कायमस्वरूपी बंद असलेल्या बिगरशेती ग्राहकांना थकबाकी मुक्त होण्याची संधी आहे. मात्र, योजनेची मुदत ३१ मार्चला संपणार असल्याने ग्राहकांनी तातडीने अर्ज करावा.

Team Agrowon

Baramati News: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी चुकत नाही ती भरावीच लागते. अशा कायमस्वरुपी बंद असलेल्या बिगरशेती ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना सुरू आहे. योजनेची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. तत्पूर्वी पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

बारामती परिमंडलात २ लाख ७७ हजार ४७२ ग्राहक अभय योजनेसाठी पात्र होते. यामध्ये बारामती मंडलात ६७ हजार २९३, सातारा ५४ हजार ८९६ व सोलापूर जिल्ह्यात १ लाख ५५ हजार २५० ग्राहकांचा समावेश आहे. मात्र यातील बारामती मंडलात ३३२४, सातारा मंडल १८९३ व सोलापूर मंडलातील ५५९८ ग्राहकांनी आतापर्यंत अभय योजनेचा लाभ घेत अनुक्रमे ३ कोटी ६० लाख,

२ कोटी ३५ लाख व ४ कोटी ६८ लाख असा १० कोटी ६५ लाखांचा भरणा केला आहे. लाभार्थी पैकी ४२०४ ग्राहकांची पुनर्जोडणी केली. तर २९७९ ग्राहकांनी नव्याने वीज जोडणी घेतली. अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपमध्ये सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाईन शक्य नसल्यास अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा.

लाभार्थी ग्राहकांना मागणीनुसार त्या जागेवर नव्याने जोडणी दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असून थकबाकी मुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
धर्मराज पेठकर, मुख्य अभियंता, बारामती परिमंडल, महावितरण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT