Abhay Yojana : महावितरण अभय योजनेची मुदत मार्च अखेरपर्यंतच

Mahavitaran : पुणे प्रादेशिक विभागामध्ये महावितरणने आणलेल्या अभय योजनेत सहभागी २९ हजार ५०१ पैकी १७ हजार २६१ वीजग्राहकांनी सध्या विजेची गरज नसतानाही योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्ती मिळवली आहे.
Electricity
Electricity Agrowon
Published on
Updated on

Solapur News : पुणे प्रादेशिक विभागामध्ये महावितरणने आणलेल्या अभय योजनेत सहभागी २९ हजार ५०१ पैकी १७ हजार २६१ वीजग्राहकांनी सध्या विजेची गरज नसतानाही योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्ती मिळवली आहे.

तर १० हजार १३५ वीजग्राहकांकडे विजेची पुनर्जोडणी करण्यात आली आणि ५९०८ ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे, कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी महावितरणकडून अभय योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.

Electricity
Abhay Yojana : करावरील व्याज आणि दंड माफीसाठी अभय योजना

महावितरण अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे.

Electricity
Abhay Yojana : अभय योजनेसाठी तीन महिन्यांची वाढ; थकबाकीदारांना दिलासा

या सोबतच मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची सोय आहे. थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

पावणेपाच हजार अर्ज

पुणे प्रादेशिक विभागामध्ये या योजनेसाठी आतापर्यंत ३३ हजार ३०४ ग्राहकांनी अर्ज केले आहे. तर २९ हजार ५०१ थकबाकीदारांनी ४३ कोटी ११ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात १२ हजार ९६ ग्राहकांनी २७ कोटी ५६ लाख, सातारा जिल्ह्यात १६६७ ग्राहकांनी २ कोटी ९ लाख, सोलापूर जिल्ह्यात ४७१९ ग्राहकांनी ४ कोटी २ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ६४५३ ग्राहकांनी ६ कोटी ३६ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ४५६६ ग्राहकांनी ३ कोटी ८ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com