Onion Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed : महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून कांदा बियाणे विक्री सुरू

Onion Seed Sell : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे लोकप्रिय खरीप कांदा बियाणे फुले समर्थ व फुले बसवंत-७८० या बियाण्यांची विक्री मंगळवार (ता. २१) पासून सुरू करण्यात येणार आहे. यंदा दिडशे क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे बियाणे विभागातून सांगण्यात आले.

Team Agrowon

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे लोकप्रिय खरीप कांदा बियाणे फुले समर्थ व फुले बसवंत-७८० या बियाण्यांची विक्री मंगळवार (ता. २१) पासून सुरू करण्यात येणार आहे. यंदा दिडशे क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे बियाणे विभागातून सांगण्यात आले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कांदा बियाणांना शेतकऱ्यांची अधिक मागणी असते. यंदासाठी मंगळवार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी शेतकऱ्यांसाठी १५० क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा बियाण्यांची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. अनेकवेळा पोलिस संरक्षणात या कांदा बियाणांची विक्री विद्यापीठांमार्फत केली गेली आहे. विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरात मुख्य प्रवेशद्वाराशेजारी बियाणे विक्री केंद्रात विक्री सुरू होणार आहे.

कांदा उत्पादक असलेल्या नाशिक, नगर व सातारा जिल्ह्यांतील कृषी विद्यापीठातील अनेक केंद्रांमध्ये देखील बियाणे विक्री सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी संशोधन केंद्र निफाड. कांदा-लसूण, द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, कृषी संशोधन केंद्र, लखमापूर, तसेच कृषी महाविद्यालय मालेगाव या ठिकाणी विक्री करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये कृषी संशोधन केंद्र, बोरगाव, कृषी विज्ञान केंद्र, धुळे, कृषी महाविद्यालय, पुणे येथे होणार आहे. नगर जिल्ह्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी महाविद्यालय, हळगाव, जामखेड व नगर-पुणे रस्त्यावरील कृषी संशोधन केंद्र, चास येथे फुले बसवंत ७८० व फुले समर्थ या बियाणांच्या विक्रीचे नियोजन विद्यापीठामार्फत केलेले आहे.

विद्यापीठाने शेतकरी बांधवांना कांदा बियाणे प्रति किलो रुपये १५०० प्रमाणे उपलब्ध केलेले आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. गेल्या तीन वर्षांपूर्वी कृषी विद्यापीठाने कांदा बियाणे ऑनलाइन पद्धतीने विक्री केल्यामुळे बियाणे विक्री केवळ चार, पाच तासांत झाली होती. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रांगेमध्ये उभे राहण्याची गरज नव्हती. यावर्षी ऑफलाइन व रोख पद्धतीने विक्री सुरू होणार आहे, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

SCROLL FOR NEXT