Onion Seed : महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा बियाणे विक्रीस प्रारंभ

Onion Seed Sale : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रात मंगळवार (ता.३०) पासून फुले समर्थ कांदा बियाण्याची विक्री सुरू करण्यात आली.
Onion Seed
Onion SeedAgrowon
Published on
Updated on

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रात मंगळवार (ता.३०) पासून फुले समर्थ कांदा बियाण्याची विक्री सुरू करण्यात आली. पाबळ (जि. पुणे) येथील शेतकरी रामदास चौधरी व मीनानाथ इंगळे यांना सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे व डॉ. चिदानंद पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कांदा बियाणे देऊन विक्रीचा प्रारंभ करण्यात आला.

गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाच्या कांदा बियाण्यांबाबत शेतकऱ्यांत जागृती झाल्याने बियाणे विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रमुख बियाणे शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके, भाजीपाला पैदासकार डॉ. भारत पाटील, डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर, डॉ. बी. डी. पाटील उपस्थित होते.

Onion Seed
Onion Seed Production : कसे आहे डाळे कुटुंबाचे कांदा बीजोत्पादन तंत्र?

१५०० रुपये प्रतिकिलोने हे बियाणे विकण्यात येत आहे. एका शेतकऱ्याला पाच किलो बियाणे रोखीने खरेदी करता येईल. मागील दोन वर्षांपूर्वीपासून विद्यापीठाने कांदा बियाणे ऑनलाइन पद्धतीने विकल्यामुळे केवळ चार-पाच तासांमध्ये सर्व बियाण्याची विक्री होत होती. या वर्षी ऑफलाइन व रोख पद्धतीने विक्री सुरू आहे.

Onion Seed
Onion Seed : कांदा बियाणे कृषी विद्यापीठांनी अत्यल्प दराने का द्यावे?

खरीप हंगामासाठी विद्यापीठाच्या फुले समर्थ कांदा बियाण्याबरोबरच मटकी (सरिता), हुलगा (सकस), ज्वारी चारा (फुले गोधन, वसुंधरा), तूर (भीमा), तीळ (फुले पूर्णा, जेएलटी-४०८), सूर्यफूल (फुले भास्कर) हे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. पुढील आठवड्यात विद्यापीठाची सर्व कृषी विज्ञान केंद्रे, कृषी संशोधन केंद्रांवर बियाणे विक्रीसाठी आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा फुले समर्थ हा गर्द लाल रंगाचा अत्यंत आकर्षक व अधिक उत्पादनक्षम खरीप व रांगडा हंगामासाठी विद्यापीठाचा अत्यंत योग्य कांदा वाण आहे. हलक्‍या जमिनीमध्ये ९० दिवसांमध्ये तयार होतो. हेक्‍टरी २०० ते २५० क्विंटल उत्पादन मिळू शकते. हा वाण शेतकऱ्यांत लोकप्रिय होत आहे.
- डॉ. आनंद सोळंके, प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com