MPKV Agrowon
ॲग्रो विशेष

MPKV Rahuri: महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाच महिन्यांपासून मिळेना कुलगुरू

Vice Chancellor Appointment Delay: गेल्या पाच महिन्यांपासून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यपीठाला नियमित कुलगुरू नसल्यामुळे प्रभारी कुलगुरू कारभार हाकत आहेत. कुलगुरूपदाची निवड करण्यासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.

Manoj Kapade

Pune News: गेल्या पाच महिन्यांपासून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यपीठाला नियमित कुलगुरू नसल्यामुळे प्रभारी कुलगुरू कारभार हाकत आहेत. कुलगुरूपदाची निवड करण्यासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्याऐवजी पाच महिन्यांत दोघांकडे कुलगुरूपदाचा तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला. नवीन कुलगुरू नेमण्यासाठी टाळाटाळ सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे २९ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले. तेव्हापासून कुलगुरू पद रिक्त आहे. त्याआधी डॉ. पाटील आजारी असताना डॉ. सातप्पा खरबडे यांच्याकडे कुलगुरूपदाचा प्रभार सोपविण्यात आला होता. डॉ. पाटील यांच्या निधनानंतर डॉ. खरबरडे यांच्याकडेच कुलगुरूपदाची प्रभारी जबाबदारी देण्यात आली.

त्यानंतर मार्च महिन्यात अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. त्याला तीन महिने उलटून गेले तरीही नवीन कुलगुरूंची नेमणूक करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. राजभवनातून अद्याप कुलगुरू शोध समितीची घोषणा करण्यात आलेली नाही.

विद्यापीठाला नियमित कुलगुरू नसल्यामुळे शिक्षण, संशोधन, विस्ताराच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यापीठात आधीच प्राध्यापक व शास्त्रज्ञांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे कामकाज विस्कळीत झाले आहे. त्यात आता कुलगुरूपदही रिक्तच असल्यामुळे विद्यापीठाला नेतृत्वच उरलेले नाही, अशी भावना अनेक शास्त्रज्ञ व प्राध्यापकांनी व्यक्त केली.

एका कृषी विद्यापीठाच्या संचालकाने सांगितले की, कृषी विद्यापीठाचा कुलगुरु म्हणजे निमशासकीय महामंडळाचा अध्यक्ष नाही. कुलगुरुपदाचा मान सरकारने जपायला हवा. महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात सन्मानाचे स्थान आहे. अशा विद्यापीठाला सहा-सहा महिने कुलगुरु नेमला जात नसेल तर संस्था अधिकच डळमळीत होऊ शकते. राज्यात अकोला व राहुरी अशा दोन्ही ठिकाणच्या विद्यापीठांच्या कामकाजाची व्याप्ती मोठी आहे.

अशा वेळी एकाच व्यक्तीला दोन विद्यापीठांचा कुलगुरु म्हणून जबाबदारी दिल्यास पायाभूत कामांकडे दुर्लक्ष होण्याची भीती असते. त्यामुळे राजभवनाने अजून टाळाटाळ न करता राहुरीच्या विद्यापीठाला त्वरीत नवा कुलगुरु मिळवून द्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाकडे माहिती नाही

प्रभारी कुलगुरु डॉ. शरद गडाख यांना राहुरच्या विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीबाबत विचारले असता ते म्हणाले, “ही प्रक्रिया पूर्णतः राज्यपालांच्या कक्षेत आहे. विद्यापीठावर तात्पुरता कुलगुरु नियुक्त करावा किंवा नव्या कुलगुरुंची शोध समिती नियुक्त करावी अशा मुद्द्यांवर स्थानिक विद्यापीठाकडून कधीही राजभवनाकडे पत्रव्यवहार केला जात नाही. तसेच, याबाबत कोणतीही माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नसते.”

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT