Agriculture Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Festival : महासंस्कृती, कृषी, बचत गट महोत्सव नगरमध्ये उद्यापासून

Agriculture Festival : सांस्कृतिक विभाग, जिल्हा परिषद व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नगर येथे गुरुवार (ता. २२) रविवार (ता. २५) या चार दिवसांत ‘महासंस्कृती, कृषी व बचत गट महोत्सव आयोजित केला आहे.

Team Agrowon

Nagar News : सांस्कृतिक विभाग, जिल्हा परिषद व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नगर येथे गुरुवार (ता. २२) रविवार (ता. २५) या चार दिवसांत ‘महासंस्कृती, कृषी व बचत गट महोत्सव आयोजित केला आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा या महोत्सवाची फारसी तयारी नाही, प्रचार व प्रसिद्धीही झाली नाही शिवाय शहरापासून बाजूला हा महोत्सव होत असल्याने फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करता यावी, घेण्यात येणारा कृषी महोत्सव स्वतंत्र घेण्याऐवजी गेल्या वर्षीपासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या हट्टापायी एकत्रित महोत्सव घेतला जात आहे. यंदाही शेतकरी, महिला बचत गटाच्या हिताऐवजी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा महोत्सव केला जात आहे.

यंदा सांस्कृतिक विभागाची याला जोड दिली आहे. या महोत्सवात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, विविध प्रांतातील संस्कृतीचे अदान- प्रदान, लुप्त होत चाललेल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन, स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसृष्टीचे दालन उभारण्यात येईल.

याबरोबरच दररोज सायंकाळी विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होतील. विभागांतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्याच्या दृष्टीने धान्य, फळे, कृषी अवजारे व कृषिनिविष्ठा यांच्या प्रदर्शनाचे २२० स्टॉल, उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्वयंसाह्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी ३०० स्टॉल आणि शासकीय विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाची शेतकरी आणि नागरिकांना माहितीसाठी विविध शासकीय विभागांचे २० स्टॉल लावण्यात येतील.

महोत्सवात ५४० स्टॉल असतील. अवजारे, खते, बी-बियाणे, संरक्षित शेती, सूक्ष्म सिंचन, अपारंपरिक ऊर्जा, बायोफर्टिलायझर, कृषी साहित्य व शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्रीची साखळी निर्माण व्हावी, या संकल्पनेतून धान्य, फळे महोत्सवाचे आयोजन केले आहे.

महोत्सव शहरापासून पाच किलोमीटरवर

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे यंदाही नियोजन जबाबदारी आहे. त्यामुळे यंदा कोट्यवधी रुपये खर्च करूनही महोत्सवाची फारशी प्रसिद्धी झालेली नाही. शिवाय शहरातील मध्यवस्तीत ठेवण्याऐवजी मुख्य शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बेहस्त महाल परिसरात हा महोत्सव होत असल्याने या महोत्सवाला फारसा प्रतिसाद मिळेल, असे सध्या तरी दिसत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology: जीपीएस, जीआयएस अन् सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर

Farm Roads: भिवंडी तालुक्यात पाणंद, शिवरस्त्यांचे सर्वेक्षण

Agriculture Technology: निर्जलीकरणासाठी फ्रीझ ड्राइंग तंत्रज्ञान

E-Crop Survey: खरिपात ई-पीक पाहणी करा

Agriculture Meet: उपकृषी अधिकारी संघटनेचा लातूरला विभागीय मेळावा

SCROLL FOR NEXT