Agriculture Festival : कृषी महोत्सवाकडे लोकप्रतिनिधींची पाठ

Krushithon Agriculture Expo 2024 : कृषी महोत्सवासाठी जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र या महोत्सवाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
Agriculture  Festival Nashik
Agriculture Festival NashikAgrowon

Nashik News : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक कृषी व नवतेजस्विनी महोत्सव शहरातील डोंगरे मैदान येथे कृषी महोत्सव १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान पार पडला. या कार्यक्रमात फळे, भाजीपाला आणि धान्य महोत्सव, शेतकरी सन्मान सोहळा, कृषी प्रदर्शन व माविम बचत गट प्रदर्शनी असे स्वरूप होते.

या महोत्सवासाठी जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र या महोत्सवाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. पालकमंत्री उद्‌घाटनासाठी आले होते; मात्र तेही नावापुरतेच अशीच परिस्थिती पाहायला मिळाली.

Agriculture  Festival Nashik
Cereal Farming : पौष्टिक तृणधान्य क्षेत्र वाढावे

शेतकऱ्यांच्या मतावर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांविषयी काहीच आस्था उरली नसल्याची टीका आता शेतकरी व शेतकरी संघटनांकडून होत आहे. यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. नैसर्गिक आपत्ती व बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने व्यवस्थेकडे पाहतो आहे. मात्र सातत्याने त्याला डावलेले जात असल्याचे दिसते. अनेक लोकप्रतिनिधींची निवासस्थाने महोत्सवाच्या शहरात तर काहींची हाकेच्या अंतरावर आहेत; मात्र तरी कुणीही या कार्यक्रमात आले नव्हते.

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रयोगशीलनेने शेती करणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी विस्तार क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी लोकप्रतिनिधींनी येऊन कौतुकाची थाप देणे अपेक्षित होते. उद्‌घा‌टनाला पालकमंत्री होते, बाकी कुणी नाहीच अखेर महोत्सवाची सांगता झाली. तरीही कुणीही हजेरी लावली नाही.

Agriculture  Festival Nashik
Cotton Procurement : शहादा येथे कापूस खरेदी पूर्ववत

पहिल्याच दिवशी शनिवारी (ता. १०) पुरस्कार वितरण समारंभ होता. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दादा भुसे तब्बल २ तास उशिरा आले. कृषी महोत्सवाचे उद्‌घाटन, भाषण व काही निवडक पुरस्कार देऊन मंत्री भुसे पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. या वेळी बहुसंख्य शेतकऱ्यांचे पुरस्कार प्रदान बाकी होते. त्यामुळे सभागृहात गोंधळ तर शेतकरी संतापल्याचे पाहायला मिळाले.

...तर शेतकऱ्यांप्रती खोटा दिखावा कशाला?

खुद्द पालकमंत्री यांनीच व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांसह कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते. मात्र स्वतः पालकमंत्री हेच वेळेचे कारण देत व संपूर्ण पुरस्कार न देताच परतल्याने अनेकांनी सभागृह सोडले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे वारंवार सांगितले जाते. मात्र शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेचा व कष्टाचा सन्मान करायला मंत्री व लोकप्रतिनिधींना शासकीय कार्यक्रमासाठी वेळ नसेल तर शेतकऱ्यांप्रती खोटा दिखावा कशाला? असा सवालही या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

शेतीमालाचे भाव पडले, बांगलादेशमध्ये आयात कर वाढवले यावर बोलायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही. कांदा आणि द्राक्ष याविषयी केंद्रशी बोलू, असे वारंवार सांगितले जाते मात्र त्यासाठी कुणाला वेळ नाही. राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना सगळ्यांना वेळ असतो. मात्र शासनाच्या खर्चातून होणाऱ्या शेतीविषयक कार्यक्रमासाठी वेळ नाही. असे कृषीप्रधान देशात सत्ताधारी व विरोधी गटाच्या लोकप्रतिनिधींचे हे वागणे योग्य नाही.
संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी संघटना
शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव आयोजित केले जातात. मात्र डझनभर खासदार व आमदार नाशिक शहरात राहत असतानाही कुणीही भेट देत नाही, या मानसिकतेची किळस येते. शेतकरी अजेंडा फक्त राजकीय भूमिकेत असतो. पक्षांच्या नेत्यांच्या दौऱ्यासाठी वेळ असतो, मात्र शेतकऱ्यांसाठी कुणाला वेळ नाही.
गणेश निंबाळकर, जिल्हाध्यक्ष-प्रहार शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com