Mahareshim Abhiyan Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Farming : हिंगोली जिल्ह्यात महारेशीम अभियानाला सुरुवात

Sericulture : हवामान बदलाच्या स्थितीत रेशीम शेती किफायतशीर ठरत असून, याचे महत्त्व पटवून देण्यासोबतच शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात ९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Hingoli News : हवामान बदलाच्या स्थितीत रेशीम शेती किफायतशीर ठरत असून, याचे महत्त्व पटवून देण्यासोबतच शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात ९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली.

या वेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनिल माचेवाड, जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे, वरिष्ठ तांत्रिक सहायक अशोक वडवळे, रंगनाथ जांबुतकर, राजू रणवीर, रजनीश कुटे, नितीन लोलगे, केतन प्रधान, कुलदीप हरसुले, राधा पाटील, रमेश भवर, उपस्थित होते.

गोयल म्हणाले, की जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर, जीवनमान उंचावण्यास मदत करणारा रेशीम उद्योग आहे. परंतु या उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने या उद्योगाकडे वळलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर व्यापक प्रमाणात जनजागृती, तसेच तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने महारेशीम अभियान जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात राबविले जात आहे.

या अभियानादरम्यान जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नाव नोंदणी करावी. जिल्ह्याला रेशीम हब बनविण्याच्या दृष्टीने महारेशीम अभियानात प्रशासकीय यंत्रणेसोबतच कृषी विभागाची मदत घेतली जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. यात केवळ मजुरीसाठी २ लाख ६५ हजार रुपये आणि कुशलचे १ लाख ५१ हजार रुपये अनुदान आहे.

रेशीम समग्र-२ योजना...

रेशीम संचालनालयाच्या वतीने केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून तुती लागवड, कीटक संगोपनगृह बांधकाम, कीटक संगोपन साहित्य, तुती लागवड फळबागा, बाल कीटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासून धागा तयार करण्यासाठी मल्टिएंड रिलिंग मशिनसाठी सर्वसाधारण वर्गासाठी ७५ टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत रेशीम शेतीचे महत्त्व, बाजारपेठेची उपलब्धता, रेशीम उद्योगासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.रेशीम उद्योग करण्यास इच्छुक लाभार्थ्यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा देशपांडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Halloween Decor: अमेरिकेत भरतो हॅलोविन महोत्सव

Weekly Weather: बहुतांशी जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता

Farmers Support: अतिवृष्टिग्रस्तांच्या मदतीला ‘महाबीज’कडून हरताळ

Mathadi Board: माथाडी मंडळाला आदेशाचा फेरविचार करण्याचा अधिकार नाही

Tomato Processing Project: शेतकरी गटाचा धान पट्ट्यात टोमॅटो प्रक्रिया प्रकल्प

SCROLL FOR NEXT