Agri Logistic Parks Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Logistic Parks: राज्यात ५ ॲग्री लॉजिस्टिक पार्क

Agri Infrastructure: राज्यातील शेतीमालाचे काढणीपश्‍चात नुकसान टाळण्यासाठी राज्यात छत्रपती संभाजीनगरच्या झांबरगाव (ता. वैजापूर) येथील लॉजिस्टिक पार्कच्या धर्तीवर ५ भव्य लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत.

गणेश कोरे

अधिक माहितीसाठी...

  • राज्यात ५ नवीन ॲग्री लॉजिस्टिक पार्क उभारणार, ८७ कोटींचा निधी अपेक्षित.

  • झांबरगाव लॉजिस्टिक मॉडेलच्या धर्तीवर अमरावती, वाशीम, बुलडाणा, राहाता येथे प्रकल्प.

  • शेतकऱ्यांच्या शेतीमाल साठवणूक, मूल्यवर्धन व तारण कर्जासाठी सुविधा वाढवणार.

  • एकूण ५३ हजार टनांची साठवण क्षमता वाढणार आहे.

  • राज्य शासन आणि जागतिक बँकेकडे प्रस्ताव पाठवला गेला आहे.

Pune News: राज्यातील शेतीमालाचे काढणीपश्‍चात नुकसान टाळण्यासाठी राज्यात छत्रपती संभाजीनगरच्या झांबरगाव (ता. वैजापूर) येथील लॉजिस्टिक पार्कच्या धर्तीवर ५ भव्य लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. यासाठी ८७ कोटींचा निधी अपेक्षित असून, याबाबतचा प्रस्ताव जागतिक बॅंकेसह राज्य शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

राज्यातील शेतीमालाची साठवणूक, मूल्यवर्धन आणि शेतीमाल तारण कर्ज या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ व्हावा या उद्देशाने राज्यात अमरावती (धामणगाव), वाशीम (कारंजा आणि मंगरूळपीर), बुलडाणा (मेहकर) आणि अहिल्यानगर (राहता) या ठिकाणी ॲग्री लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे, असे श्री. दिवेगावकर यांनी सांगितले.

वखार महामंडळाकडून यापूर्वी समृद्धी महामार्गालगत झांबरगाव (ता. वैजापूर) येथे लॉजिस्टिक पार्क आणि सायलोज उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी सोयाबीन, हरभरा, तूर आदींची अत्याधुनिक साठवणूक केंद्रे करण्यात आली आहेत.

तेथे शेतकऱ्यांना शेतीमाल तारण योजनादेखील राबविण्यात येत असून, याच धर्तीवर आणखी लॉजिस्टिक पार्क उभारण्याची प्रक्रिया वखार महामंडळाद्वारे सुरू आहे. या माध्यमातून ५३ हजार टनांनी साठवण क्षमता वाढणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेऊन, निधी देण्याचे आश्‍वासन दिले असल्याचेही श्री. दिवेगावकर यांनी या वेळी सांगितले.

येथे होणार लॉजिस्टिक पार्क साठवण क्षमता प्रकल्प खर्च

१) धामणगाव (अमरावती) ५ हजार टन १४ कोटी १९ लाख

२) कारंजा (वाशीम) १० हजार १५ कोटी ५५ लाख

३) मंगरूळपीर (वाशीम) १५ हजार टन २२ कोटी ११ लाख

४) मेहकर (बुलडाणा) २० हजार टन २८ कोटी ६६ लाख

५) राहाता (अहिल्यानगर) ३ हजार टन ६ कोटी ४७ लाख

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

१. या लॉजिस्टिक पार्कचा उद्देश काय आहे?
शेतमालाची साठवणूक सुधारणे आणि तारण कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करणे.

२. या प्रकल्पात कोणते जिल्हे समाविष्ट आहेत?
अमरावती, वाशीम, बुलडाणा, आणि राहाता (अहिल्यानगर).

३. या पायाभूत सुविधा कोणी उभारणार आहे?
वखार महामंडळ या सुविधा उभारणार असून त्यांनी प्रस्ताव तयार केला आहे.

४. या पार्कमधून शेतकऱ्यांना काय लाभ होईल?
शेतकऱ्यांना कमी नुकसान, चांगली साठवण, तारण कर्ज उपलब्ध होईल.

५. या प्रकल्पासाठी निधी कुठून येणार आहे?
जागतिक बँक आणि राज्य शासनाकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Damage: बारामती तालुक्यात वादळी वाऱ्याने केळी बागांचे नुकसान

Farm Loan Waiver: पुणे जिल्ह्यात ३.१५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

Agrowon Sarpanch Mahaparishad: पुण्यात ॲग्रोवन’ची विभाग स्तरीय सरपंच महापरिषद

Dairy Business Crisis: पशुखाद्य, चारा महागल्याने दूध व्यवसाय आतबट्ट्यातच

Sick Bull Controversy: सरकारी बैलाला आजाराची बाधा

SCROLL FOR NEXT