MPSC Exam Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Exam : कृषी सेवेतील पदासंह संयुक्त पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर; १ डिसेंबर रोजी परीक्षेचं एमपीएससीकडून आयोजन

MPSC Exam 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या पूर्व परीक्षेची कृषी सेवेतील पदांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता ही परीक्षा १ डिसेंबर रोजी होणार आहे. या पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा देखील समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले आहे.

पण सप्टेंबर महिना संपत आला असतानाही आयोगाने परीक्षेची नवी तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पर्धा परीक्षांच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. यानंतर आयोगाने सोमवारी (ता.२३) बैठक घेत असल्याचं जाहीर केले होते. तर कृषी सेवेतील पदांच्या समावेश करण्यात येईल असे स्पष्टीकरण दिले होते.

याप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता परीक्षेची आयोजन १ डिसेंबर रोजी केले जाईल, अशी माहिती आयोगाने ट्वीट करत दिली आहे. मात्र वाढीव जांगाच्याबाबतीत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. यावरून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे.

कृषी पदवीधरांना संधी

पण आयोगाने पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश केल्याने कृषी पदवीधरांना संधी मिळाली आहे. तर आयोगाकने कृषी सेवेसंदर्भात शुद्धिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर २१ दिवसांत उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

जागावाढीचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच

आयोगाने पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश केल्यावरून आमदर रोहित पवार यांनी आयोगाचे आभार मानले आहेत. तसेच आयोगाने परीक्षेची तारीख याच्याआधीच जाहीर करायला हवी होती.

पण विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून मंत्रालयापर्यंत लढा देता आले. याचेच समाधान आहे. तसेच शरद पवार यांनी देखील या प्रश्नावर वेळोवेळी पाठपुरावा केला असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. तर जागावाढीचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच असून तोही प्रश्न आयोगाने लवकर मार्गी लावावा, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन

गेल्या महिन्यात आयोगाकडून २५ तारखेला संयुक्त पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. तर याचवेळी आयबीपीएसची देखील परीक्षा होती.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी कृषी सेवेतील पदांचा समावेशासह संयुक्त पूर्व परीक्षेतील पदांची संख्या वाढवून नवी जाहिरात काढण्यात यावी अशी मागणी केली होती. यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह कृषी पदवीधरांनी पुण्यातील लाल बहादूरशास्त्री रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आयोगाने परिक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

E-Peek Pahani : शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला कमी प्रतिसाद

Banana Plantation : मृग बहर केळी लागवड ६० हजार हेक्टरवर

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT