Almatti Dam agrowon
ॲग्रो विशेष

Almatti Dam : अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याला महाराष्ट्राचा विरोधच; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

Devendra Fadanvis : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबत तयारी सुरू केली आहे. याला महाराष्ट्र सरकारचा तीव्र विरोध असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

sandeep Shirguppe

Karnataka vs Maharashtra : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबत तयारी सुरू केली आहे. याला महाराष्ट्र सरकारचा तीव्र विरोध असेल, त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने हरकत घेतली आहे. जर अलमट्टी धरणाची उंच्ची वाढवण्याचा निर्णय झालाच तर कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात प्रसंगी कोर्टात जाण्याची तयारी ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ता.०६) यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना दिली.

शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन धर्मियांच्या पंचकल्याणक् कार्यक्रमावेळी फडणवीस म्हणाले की, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा धोका अधिक होऊ देणार नाही. अलमट्टीची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबत महाराष्ट्र सरकारने समिती नेमली आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अफवांवर विश्वास ठेवू नका

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची यंत्रणा राज्यातील सर्व आरोग्य विभागाशी चर्चा करणार आहे. त्याबाबतच्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहे. कपोकल्पित माहितींवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितींवर विश्वास ठेवा. अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल असा आमचा प्रयत्न आहे. आज(ता.०६) सोमवारी आरोग्य विभागाची बैठक झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाची बैठक ऑनलाईन सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पत्र लिहीलं आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "या प्रकरणावर निर्धाराने राज्य सरकारने कारवाई केली आहे. कुठेही आम्ही मागे हटलो नाही हटणार नाही. दोषींना सोडणार नाही आणि धमक्या देणाऱ्यांना ही सोडणार नाही", असे फडणवीस यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price: देशात कापसाचे दर नरमले

Maharashtra GSDP: राज्याचे स्थूल उत्पन्न होणार वर्षातून दोन वेळा प्रकाशित

Crop Compensation Issue: सुधारित पीकविमा योजनेमुळे भरपाईला ठेंगा

Fertilizer Shortage: देशातील खत टंचाईमुळे आयातीच्या हालचालींना जोर

Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT