Farmers Scheme Acre 12000 : शेतकऱ्यांना एकरी १२ हजार देणार; तेलंगणा सरकार शेतीयोग्य जमिनिसाठी देणार सरसकट मदत

Government Scheme : तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. रयतु भरोसा योजनेतून तेलंगणा शेतकऱ्यांना वर्षाला प्रतिएकर १२ हजार रुपये मदत देणार आहे.
Agriculture Land
Agriculture LandAgrowon
Published on
Updated on

Pune News : तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. रयतु भरोसा योजनेतून तेलंगणा शेतकऱ्यांना वर्षाला प्रतिएकर १२ हजार रुपये मदत देणार आहे. राज्यातील सर्व शेतीयोग्य जमिनीसाठी ही मदत दिली जाणार आहे.

तसेच भुमिहीन शेत मजुरांनाही इंदिराम्मा आत्मीया भरोसा योजनतून वर्षाला १२ हजार रुपये दिले जाणार आहेत. या महिन्यापासून म्हणजेच २६ जानेवारीपासून या योजनेला सुरुवात होणार आहे. तसेच कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना ही मदत देण्यात येईल, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी सांगितले.

तेलंगणा सरकारने नव्या वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही निर्णय नुकतेच जाहीर केले. त्यातील महत्वाचा निर्णय म्हणजे रयतु भरोसा योजनेतून शेतकऱ्यांना देण्यात येणारा निधी वाढवण्यात आला. सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये मिळतात. आता या मदतीत २ हजारांची वाढ करण्यात आली. आता शेतकऱ्यांना एकरी १२ हजार रुपये मिळतील. महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये देण्याची मागणी केली जात आहे. मात्र तेलंगणा सरकारने आधीच ही योजना सुरु केली आणि आता रकमेतही वाढ केली आहे.

Agriculture Land
Agriculture Land : अमरावती जिल्ह्यातील ५४ हजार हेक्टर शेतजमीन नापेर

तेलंगणातील सर्व शेतीयोग्य जमिनिसाठी शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. बिगर शेती वापर असलेल्या शेतीसाठी ही योजना लागू नसेल. खणन, डोंगर, रिअर इस्टेट, रोड, रहीवासी वापर, उद्योग, आर्थिक वापर, ओढे-नाल्यांमध्ये बदललेली जमिन आणि सरकारने विविध कारणांसाठी केलेले भूसंपदन या जमिनिंसाठी ही मदत मिळणार नाही, असे तेलंगणा सरकारने स्पष्ट केले. शेती होणाऱ्या जमिनिसाठीच ही मदत मिळणार आहे.

Agriculture Land
Agriculture Land Scheme : अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील भूमिहिन, शेतमजुरांना देणार शेतजमिनी

शेतमजुरांसाठीही सरकारने ही मदत लागू केली. राज्यातील शेतकमजुरांनीही १२ हजार रुपये मिळणार आहेत. त्यासाठी इंदीराम्मा आत्मीय भरोसा योजना सुरु करण्यात आली. शेतमजुरांच्या प्रत्येक कुटुंबांना वर्षाला १२ हजार रुपये देण्यात येणार आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटूंबांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना ही मदत देताना कोणतेही नियम आणि अटी लावले जाणार नाहीत. शेतीयोग्य जमिनिसाठी सरसकट मदत देण्यात येणार आहे. राज्यात शेतीयोग्य जमिनि कुणाकडे किती आहे, याची माहिती राज्याकडे आहे. त्याचा वापर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही वाचेल, असेही मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com