National Water Awards Agrowon
ॲग्रो विशेष

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Awards Update : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप दिसून आली. सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्था गटात ‘पेनटाकळी प्रकल्पस्तरीय पाणी वापर महासंघ’ देशात प्रथम, तर सर्वोत्कृष्ट संस्था गटात ‘बायफ’ संस्थेस प्रथम व ‘युवामित्र’ संस्थेस द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

Team Agrowon

Nashik News : ‘जल समृद्ध भारता’ची संकल्पना साध्य करण्यासाठी देशभरातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागातर्फे राष्ट्रीय जल पुरस्कार दिले जातात. या पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप दिसून आली. सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्था गटात ‘पेनटाकळी प्रकल्पस्तरीय पाणी वापर महासंघ’ देशात प्रथम, तर सर्वोत्कृष्ट संस्था गटात ‘बायफ’ संस्थेस प्रथम व ‘युवामित्र’ संस्थेस द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी नवी दिल्लीतील श्रमशक्ती भवन येथे पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे.  एकूण ९ गटांत ३८ विजेते आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य, सर्वोत्कृष्ट जिल्हा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था, सर्वोत्कृष्ट शाळा किंवा महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट उद्योग, सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ता संघ, सर्वोत्कृष्ट संस्था (शाळा किंवा महाविद्यालयाव्यतिरिक्त), आणि सर्वोत्कृष्ट नागरी संस्था यांचा समवेश आहे. पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्र आणि चषक तसेच काही श्रेणींमध्ये रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक ओडिशा राज्याला मिळाले आहे. उत्तर प्रदेशाने दुसरे, तर गुजरात आणि पुद्दुचेरीने संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले आहे. सर्वोत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था गटात पुणे तिसऱ्या स्थानी आहे. सर्वोत्कृष्ट उद्योग गटात यवतमाळ येथील रेमंड युको डेनिम प्रा. लि यांस तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे

२२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवनातील वाजता प्लेनरी हॉल येथे पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. पाण्याचे महत्त्व विशद करण्यासह समाजामध्ये जनजागृती करणे तसेच सर्वोत्तम पाणी वापर पद्धती अवलंब करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना प्रोत्साहित करणे या पुरस्कारांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. जलस्रोत संवर्धन व व्यवस्थापन या कार्यात सक्षमपणे लोकसभा वाढविण्यासाठी पुरस्कारांच्या निमित्ताने ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT