Reshimratna Award : अमरावतीत 'रेशीमरत्न पुरस्कार २०२३' चे वितरण ; शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून अधिक उत्पन्नाचे आवाहन

Farmer Honour : अमरावतीत महाराष्ट्र राज्य रेशीम संचालनालयातर्फे सोमवारी (ता. ७) उत्कृष्ट रेशीम शेतकऱ्यांचा 'रेशीमरत्न पुरस्कार २०२३' ने गौरव करण्यात आला.
Chandrakant Dada Patil
Chandrakant Dada Patil Agrowon
Published on
Updated on

Amravati News : अमरावतीत महाराष्ट्र राज्य रेशीम संचालनालयातर्फे सोमवारी (ता. ७) उत्कृष्ट रेशीम शेतकऱ्यांचा 'रेशीमरत्न पुरस्कार २०२३' ने गौरव करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील रेशीम शेतीतील नवकल्पना, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब, तसेच उत्पादन वाढीमध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर, देवगाव येथील शहादेवजी किसनराव ढाकणे आणि सदाशिव गोपीनाथ गीते या रेशीम शेतकऱ्यांना 'रेशीमरत्न पुरस्कार' देण्यात आला. तसेच रेशीम शेतीत अधिक उत्पन्नाची संधी असून शेतकऱ्यांनी या क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Chandrakant Dada Patil
Agriculture Award : दहा शेतकरी, दोन कर्मचाऱ्यांचा राज्य कृषी पुरस्काराने सन्मान

या कार्यक्रमावेळी पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, 'इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून अधिक उत्पन्न मिळवणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आपला आर्थिक विकास साधावा.'

तसेच, रेशीम उत्पादन वाढल्यास प्रत्येक जिल्ह्यात रेशीम खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल,अशी आश्वासने देत सोलापूर येथे याच धर्तीवर केंद्र स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शेतकऱ्यांनी उत्कृष्ट बियाणे, पाणी, खते आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतल्यास ते शासनाच्या मदतीशिवाय स्वयंपूर्ण होऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Chandrakant Dada Patil
Reshim Ratna Award : रेशीम उत्पादकांचा होणार ‘रेशीम रत्न’ पुरस्काराने गौरव

या समारंभात कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील, खासदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांनीही रेशीम शेतीतून उत्पादन वाढीसाठी पुढाकार घ्यावा. अल्पभूधारक शेतकरीदेखील रेशीम शेतीद्वारे अधिक उत्पन्न मिळवू शकतात.
चंद्रकांतदादा पाटील - महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com