Sugarcane Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Maharashtra : ऊस गाळपात महाराष्ट्र आघाडीवर, देशातील साखर उत्पादन घटलं

Sugarcane Issue : पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरावरून संघर्ष निर्माण झाल्याने गळीत हंगाम अत्यंत संथ गतीने सुरू होता.

sandeep Shirguppe

Sugarcane Rate Maharashtra : राज्यात १ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू झाला. पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरावरून संघर्ष निर्माण झाल्याने गळीत हंगाम अत्यंत संथ गतीने सुरू होता. दरम्यान नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून गळीत हंगामाने जोर घेतला आहे. महाराष्ट्रात १५ डिसेंबरपर्यंत २४.८५ लाख टन, तर उत्तर प्रदेशात २२.६५ लाख टन, याचबरोबर महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटकात १७.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

अल निनो'चा प्रादुर्भाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांनी साखर उत्पादनातील आपली आघाडी कायम ठेवली आहे. दरम्यान महाराष्ट्रात हंगाम उशिरा सुरू होऊन गाळपात मात्र आघाडीवर असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

गळीत हंगाम सुरू झाल्यापासून ते १५ डिसेंबरपर्यंत देशातील १२ राज्यांत ४९९ साखर कारखान्यामध्ये ८५७.०४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. मागच्या वर्षी १५ डिसेंबरपर्यंत ९२४.३३ लाख टन ऊस गाळप झाले होते. महाराष्ट्राने २९६ लाख टन गाळप करून गाळपातही देशात आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात २४३ लाख टन, तर कर्नाटकात २११ लाख टनांचे उसाचे गाळप झाले आहे.

संपूर्ण देशात १५ डिसेंबरपर्यंत ७४.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत ते ८१.८० लक्ष टन झाले होते. चालू हंगामाअखेर देशभरात २९१.५० लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे.

साखर उताऱ्यात उत्तर प्रदेशची बाजी १५ डिसेंबरपर्यंत देशातील साखरेचा सरासरी उतारा ८.६७ टक्के असून यात उत्तर प्रदेशाने बाजी मारली मारली आहे. उत्तर प्रदेशात साखरेचा सरासरी उतारा ९.३० टक्के आहे. महाराष्ट्राचा ८.४० टक्के आणि कर्नाटकाचा ८.३० टक्के इतका सरासरी साखर उतारा आहे. थंडी वाढेल तसतसा साखर उतारा वाढण्याची अपेक्षा आहे.

इथेनॉलनिर्मितीवर बंधनामुळे साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता होती. ही बंधने शिथिल उसाच्या रसापासून तसेच बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्याचा आणि १७ लाख टन साखर इथेनॉलनिर्मितीकडे वळविण्याला अनुमती देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय साखर उद्योगाला दिलासा देणारा असल्याचे मत साखर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT