Wet Cotton
Wet Cotton Agrowon

Cotton Rate : ओल्या कापसाच्या दरात एक हजार रुपयांनी घट

Unseasonal Rain Crop Damage : अवकाळी पावसाने काळवंडलेल्या कापसाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. तब्बल २० ते २५ टक्के क्षेत्रावरील कापूस ओला झाला होता. ओल्या कापसाला सुपर कापसाच्या तुलनेत तब्बल एक हजार रुपये कमी दर मिळत आहे.
Published on

Yavatmal News : अवकाळी पावसाने काळवंडलेल्या कापसाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. तब्बल २० ते २५ टक्के क्षेत्रावरील कापूस ओला झाला होता. ओल्या कापसाला सुपर कापसाच्या तुलनेत तब्बल एक हजार रुपये कमी दर मिळत आहे. प्रतवारी घसरल्याने दरात घट झाली आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर महिना कापसासाठी महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात मोठ्या प्रमाणात कापूस वेचणीला येतो. यंदा नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २० ते २५ टक्के क्षेत्रावरील कापसाला फटका बसला आहे.

Wet Cotton
Cotton Market : परभणी जिल्ह्यात भिजलेल्या कापसाचे दर सहा हजारांच्या खाली

जिल्ह्यात दरवर्षी साधारणत: दहा लाख गाठी होतात. अवकाळी पावसाने बारा लाख क्विंटल कापूस ओला झाल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांचा आहे. कापूस ओला झाल्याने प्रतवारी घसरली आहे. त्याचा परिणाम दरावरही झाला आहे.

Wet Cotton
Cotton Picking : दोन वेचण्यांतच कपाशीच्या पऱ्हाट्या

बाजारात आधीच कापसाचे दर घसरले आहेत. त्यामुळे ओल्या कापसाचे दर त्यापेक्षा खाली आले आहेत. बाजारात कापसाला साडे सहा ते सात हजार रुपये दर मिळत आहे. त्यापेक्षा एक हजार रुपये कमी दर ओल्या कापसाला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे. या दरामुळे कापूस वेचणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

हमीभाव केंद्राची प्रतीक्षाच

दरवर्षी मोठा गाजावाजा करीत शासन हमीभाव केंद्रे सुरू करते. यंदा केंद्र सुरू झालेली नाहीत. सीसीआय आता केंद्र सुरू करीत आहे. पणनचे तर केंद्र सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे खासगी बाजार ठरवतील तेच दर कापसाला मिळत आहेत. कापसाला सध्या तरी हमीभावा ऐवढेच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

कामापुरत्याच कापसाची विक्री

परतीच्या पावसाने कपाशी बोंड स्पंजसारखे फुलले नाही. बोंडाची निब्बर कवडी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पहिल्याच वेचणीचा कापूस आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी भाव कमी असल्याने कापूस विकला नाही. उदरनिर्वाह भागविण्यासाठी किरकोळ स्वरूपात विक्री केला जात आहे. ठोक स्वरूपात चाळीस-पन्नास किलोहून अधिक शेतकरी विकत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com