Banana Export Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Export : केळी निर्यातीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

Maharashtra Banana Production : केळी निर्यातीत देशातून सतत वाढ होत आहे. एप्रिल २०२३ ते जून २०२४ या कालावधीत देशातून सुमारे २४ हजार कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : केळी निर्यातीत देशातून सतत वाढ होत आहे. एप्रिल २०२३ ते जून २०२४ या कालावधीत देशातून सुमारे २४ हजार कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात झाली आहे. २०२२-२३च्या तुलनेत ही निर्यात सुमारे सात हजार कंटेनरने वधारली आहे. तर देशात केळी निर्यातीत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.

इस्राईल व आखातात तणाव असल्याने निर्यातीसंबंधी अडचणी आल्या. सुएझ कालव्याऐवजी आफ्रिकेला वळसा घालून निर्यात सुरू राहिली. यात निर्यातीसंबंधी भाडेवाढ झाली. अशातही केळी निर्यात वाढली आहे. केळीची सर्वाधिक निर्यात आखातात झाली आहे.

केळी निर्यातीत महाराष्ट्राने आघाडी घेतली असून एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ६२ टक्क्यांपर्यंत राहिला आहे. या पाठोपाठ गुजरात, आंध्र प्रदेश व केरळ येथून केळी निर्यात झाली आहे. देशात केळी लागवडीचे पॅटर्न, कालावधी बदलले आहेत.

बारमाही केळी निर्यातीसाठी उपलब्ध आहे. राज्यात केळी लागवडीत वाढ झाली नाही. परंतु दर्जेदार व निर्यातक्षम केळी अधिकची उपलब्ध होत आहे. परिणामी निर्यातीत वाढ होत असल्याची माहिती मिळाली.

राज्यातून अजूनही केळी निर्यात सुरू आहे. सर्वाधिक निर्यात सोलापूर भागातून झाली आहे. परंतु सोलापुरात उन्हाळ्यात केळी निर्यातीसाठी उपलब्ध नव्हती. या कालावधीत खानदेशात केळी अधिकची उपलब्ध झाली. रोज १०० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) केळी मार्च ते मे या कालावधीत खानदेशात निर्यातीसाठी उपलब्ध झाली.

रोज १० कंपन्या केळी निर्यातीचे काम खानदेशात उन्हाळ्यात करीत होत्या. सध्या सोलापुरात केळी उपलब्ध नाही. खानदेशातून रोज चार कंटेनर केळीची निर्यात होत आहे. तसेच देशांतर्गत बाजारातही रोज २१० ट्रकपेक्षा अधिकची केळी खानदेशातून पाठविली जात आहे.

मागील हंगामाच्या तुलनेत दर कमी

‘कुकुंबर मोझॅक’ विषाणूची समस्या एप्रिल व मे या महिन्यात लागवड केलेल्या केळी रोपांत कमी येत असल्याचे लक्षात घेऊन एप्रिल व मे २०२३ मध्ये अनेकांनी केळी लागवड केली. जून व जुलैत केळी लागवड टाळली.

परिणामी यंदा मार्च व एप्रिलमध्ये निर्यातक्षम केळी अधिकची काढणीवर आली. देशांतर्गत व निर्यातीसाठी मिळून खानदेशात रोज ६०० ट्रक केळी काढणीसाठी एप्रिल व मे महिन्यात उपलब्ध होती. २०२२-२३ मध्ये निर्यातीच्या केळीला कमाल ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. यंदा मात्र कमाल दर १६०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT