Banana Export : आखाती देशात सहाशे टन केळीची निर्यात

Banana Market : कोरोना लॉकडाउननंतर सध्या केळीची निर्यात होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अन्यथा अनेकवेळा अत्यल्प दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे अवघड होऊन बसते.
Banana Export
Banana ExportAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या अर्धापूर तालुक्यातील केळीची निर्यात आखाती देशात होत आहे. बारड येथील शीतलादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून गेल्या ३० दिवसांत इराण, इराक, अफगाणिस्तान, ओमान, दुबईसह इतर देशांत ६०० टन केळीची निर्यात केली आहे. सध्या देशासह विदेशात केळीला मागणी वाढल्याने १४०० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळत असल्याचे कंपनीचे संचालक नीलेश देशमुख यांनी सांगितले.

कोरोना लॉकडाउननंतर सध्या केळीची निर्यात होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अन्यथा अनेकवेळा अत्यल्प दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे अवघड होऊन बसते. परंतु सध्या संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

Banana Export
Banana Production : खानदेशात केळी कंदांखाली क्षेत्र अधिक

जिल्ह्यातून देशातील प्रमुख शहरात व इराणसह अनेक देशांत केळीच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. आठशे ते हजार रुपये प्रति क्विंटलवर असलेला दर आता १४०० ते १५०० पर्यंत गेल्यामुळे शेतकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील अर्धापूर परिसरात पिकणारी केळी ही खाण्यासाठी चविष्ट व टिकाऊ असल्यामुळे मोठी मागणी असते.

चांगले पर्जन्यमान आणि इसापूर-येलदरी धरणांत पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे केळीची लागवड झाली होती. नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाना या राज्यांत केळी पाठविणे सुरू आहे. दर्जेदार केळीची निवड करून बांधावरच मागणीप्रमाणे पॅकिंग करून गाडी भरण्यात येत आहे. तसेच जहाजांच्या माध्यमातून इराणसह विविध देशांत निर्यात होत आहे.

Banana Export
Banana Market : खानदेशात केळी दरात सुधारणा

गेल्या ३० दिवसांत इराण, इराक, अफगाणिस्तान, ओमान, दुबईसह इतर देशांत ६०० टन केळी निर्यात केली आहे. केळींची मागणी वाढल्यास दरातही चांगली सुधारणा होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या व्यापाऱ्यांचा कल अर्धापूर परिसरात केळीकडे वाढला आहे. गत काही दिवसांत मागणी वाढल्याने केळीच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे.

दरवाढी शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक

एप्रिल व मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात केळीला दोन हजार रुपये क्विंटल भाव होता. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बाराशे रुपये दर मिळाला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सहाशे रुपये आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाचशे रुपये दर मिळू लागला. यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते.

केळीला दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळीकडे दुर्लक्ष केले होते. तसेच उन्हाची तीव्रता वाढल्याने केळी वाळू लागली. अशावेळी केळीच्या दरात आश्‍वासक वाढ होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com