Maharashtra Kesari 2025  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Kesari 2025 : कर्जत येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शानदार सुरुवात

Sharad Pawar : राज्यभरातून ४५ संघासह ९०० स्पर्धकांचा यात सहभाग असून रविवारी (ता. ३०) महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबासाठी स्पर्धेतील अंतिम कुस्ती होईल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते विजेत्याला बक्षिसे देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Ahilynagar News : कर्जत (जि. अहिल्यानगर) येथे बुधवार (ता. २६) पासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व आमदार रोहीत पवार यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर जिल्हा तालीम संघातर्फे ६६ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

राज्यभरातून ४५ संघासह ९०० स्पर्धकांचा यात सहभाग असून रविवारी (ता. ३०) महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबासाठी स्पर्धेतील अंतिम कुस्ती होईल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते विजेत्याला बक्षिसे देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रमुख ऋषिकेश धांडे यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रातील कुस्ती या रांगड्या खेळात महाराष्ट्र केसरी हा सर्वोच्च किताब दिली जातो. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आतापर्यंत या स्पर्धा घेतल्या गेल्या. मात्र अलीकडच्या काही वर्षात परिषदेत दोन गट झाले आणि कुस्तीगीर संघ स्थापन झाला. अहिल्यानगर येथे दोन महिन्यांपूर्वी राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली.

त्यानंतर आता कर्जत (जि. अहिल्यानगर) येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने पुन्हा महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धा होत आहे. राज्य राज्यभरातून सुमारे १५० च्यावर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पंच सहभागी झाले आहेत.

माती आणि गादी विभागात ५७, ६५ आणि ७४ किलो वजनी गटांतील एकूण ४५ संघ आणि वेगवेगळ्या वयोगटातील ९०० कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि जिल्हा तालीम संघातर्फे या स्पर्धा होत आहेत. पंच उजळणी, वैद्यकीय तपासणी आणि विविध गटांतील वजने आदी सोपस्कार पार पाडत बुधवारी (ता. २६) सायंकाळी पाच वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला.

गुरुवारी (ता. २७) महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेले सर्व विजेतेही या कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली. गादी आणि माती गटातील ६१, ८६ आणि १२५ वयोगटांतील कुस्तीपटूंची वैद्यकीय तपासणी, वजन आदी बाबी पार पडल्या.

संत सद्‍गुरू गोदड महाराज क्रीडा नगरीत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने गॅलरी उभारण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी मोठे स्क्रीन उभारण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठी खास प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. हे या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य आहे.

स्पर्धेच्या नियोजनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम सुविधा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंचांची नेमणूक, तसेच गुणवत्तेनुसार विजेता ठरावा यासाठी कोणताही राजकीय हस्तक्षेप न होण्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच या कुस्ती स्पर्धेमध्ये निर्णय घेताना तसूभरही चूक होऊ नये, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

कुस्तीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि मल्लांना योग्य प्रशिक्षण व संधी उपलब्ध व्हावी, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले रविवारी स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबासाठी अंतिम लढत होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हस्ते चांदीच्या गदेसह बक्षीस वितरण होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement: मका, ज्वारीची १ मेपासून हमीभावाने खरेदी

Tree Plantation: १९ हेक्टरवर ५७ लाख रोपणास ३.६९ कोटी होणार खर्च

Fertilizer Supply: परभणी जिल्ह्यात खरिपासाठी एक लाख ६१ हजार टन खतांचा पुरवठा

Tribal Economy: मोहाच्या फुलांमुळे स्थानिक अर्थकारणाला बळ

Drought Management Committee: जिल्हास्तरीय ‘दुष्काळ व्यवस्थापन समिती’ची नव्याने रचना

SCROLL FOR NEXT