Maharashtra Assembly Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election : काँग्रेसने जाहीर केली दुसरी यादी; २३ जागांवर कोणाला लॉट्री?

Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपांचा तिढा सुटला असून ८५-८५-८५ जागा वाट्याला आलेल्या आहेत. यानंतर शनिवारी (ता.२६) काँग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकीचा रंग चढत असतानाच काँग्रेसने शनिवारी (ता. २६) २३ उमेदवारांची यादी जाहीर केली. याच्याआधी काँग्रेसने ४८ उमेदवारांची घोषणा केली होती. तर दिल्लीमध्ये शुक्रवारी (ता.२५) काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर दुसऱ्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. याच्याआधी काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ उमेदवारांची घोषणा केली होती.

दुसऱ्या यादीमध्ये काही विद्यमान आमदारांना स्थान देण्यात आले असले तरीही काही आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामध्ये अहमदनगर श्रीरामपूर मतदार संघाचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचे नाव आहे. कानडे यांच्या जागी हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे

२३ जागांवर कोणाला लॉट्री

राजेश मानवटकर (भुसावळ), स्वाती वाकेकर जळगाव (जामोद), महेश गंगाणे (अकोट), शेखर शेंडे (वर्धा), अनुजा केदार (सावनेर), गिरीश पांडव (नागपूर दक्षिण), सुरेश भोयार (कामटी), पुजा तवेकर (भंडारा), गणेशकुमार यादव (सायन कोळीवाडा), हेमंत ओघले (श्रीरामपुर), अभयकुमार साळुंके (निलंगा), गणपतराव पाटील (शिरोळ), साहेबराव कामंबळे (उमरेखड), मधुकर देशमुख (औरंगाबाद ईस्ट) , कैलास गोरंट्याल (जालना), विजय पाटील (वसई), यशवंत सिंह (चारकोप), कालू भडेलिया (कांदिवली ईस्ट), अनिल मांगुळकर (यवतमाळ), जितेंद्र मोघे (अर्णी), दिलीप बनसोड (अर्जुनी मोरगाव), वसंत पुरके (राळेगाव)

बँक घोटाळा केदारांना भोवला

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत नागपूर जिल्ह्यातील तीन मतदार संघांचा समावेश करण्यात आला असून यात नागपूर दक्षिण, सावनेर आणि कामठी मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर गिरीश पांडव, अनुजा सुनील केदार आणि सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी रद्द झाली. यामुळे आता त्यांच्या पत्नी अनुजा केदार यांना काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उरवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT