B. G. Mahajan Agrowon
ॲग्रो विशेष

Mahua Flower Processing : महाजन यांनी मोहाचे केले मूल्यवर्धन

Mahua Flower : चुंचाळे (ता. चोपडा) येथील बी. जी. महाजन यांनी आपल्या ५० एकरांपैकी १२ एकरांत मोहवृक्षाची लागवड यावल (जि. जळगाव) येथील वन विभागाच्या परवानगीतून २००७ मध्ये केली होती.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Development of Different Varieties of Mahua Flowers :

विविध जातींचा विकास

चुंचाळे (ता. चोपडा) येथील बी. जी. महाजन यांनी आपल्या ५० एकरांपैकी १२ एकरांत मोहवृक्षाची लागवड यावल (जि. जळगाव) येथील वन विभागाच्या परवानगीतून २००७ मध्ये केली होती. आदिवासी क्षेत्रात पथदर्शक प्रकल्प म्हणून या लागवडीकडे पाहिले गेले. शेतीसाठी हा कल्पवृक्ष ठरू शकतो असा महाजन यांचा त्यामागील विचार होता.

काळ्या कसदार शेतात त्यांनी सुमारे ९०० झाडांची लागवड केली. पुढे पारंपरिक वाणांतून विविध गुणवैशिष्ट्यांच्या पाच जाती त्यांनी निवड पद्धतीने विकसित केल्या. चिंगम, सिंगम, बागम, अगम व अनुगम अशी नावे त्यांनी दिली. मोह वृक्षाची सांख्यिकीय माहिती देखील महाजन यांनी संकलित केली आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) २०१९ या वर्षाचा प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांचा सन्मान केला आहे. कोची (केरळ) येथील शेतकरी- शास्त्रज्ञ चर्चासत्रातही त्यांचा गौरव झाला आहे. पाल (ता. रावेर, जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ महेश महाजन यांचे मार्गदर्शन त्यांना लाभते.

प्रकल्पासाठी विशेष परवाने

जळगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बाब म्हणून महाजन यांना मोह फळबागेसंबंधी परवाना प्रदान केला आहे. प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा परवाना मिळविण्यात मात्र त्यांना अडचणी येत आहेत.

ब्रिटिशकालीन कायद्यामुळे मोह वृक्षाची लागवड बिगर आदिवासी क्षेत्रात करता येत नाही. यामुळे हा वृक्ष नामशेष होत आहे. त्याच्या लागवडीसाठी शेतीसाठी, बिगर आदिवासी क्षेत्रात लागवडीसाठी पूरक कायदा आणावा, प्रक्रियेला प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली आहे.

उत्पादनांची विक्री

मोहाच्या बिया, साल, चीक, फुले, मूळ आदींपासून महाजन यांनी विविध पोषक खाद्यपदार्थ तयार केले आहेत. त्यात ‘पल्प’, ‘सिरप’, टोळंबी तेल, पेंड (ढेप), वाळविलेली फुले, मोहाचे लाडू आदींचा समावेश आहे. मोहापासून आणखी कोणते मूल्यवर्धन करता येईल यासाठी ते सतत अभ्यास करत असतात.

बिगर आदिवासी क्षेत्रात मोहाची विक्री, प्रक्रिया यावर बंधन असल्याने त्यास मोठी बाजारपेठ मिळवणे महाजन यांना अद्याप शक्य झालेले नाही. परंतु आदिवासी क्षेत्रातील कृष्णापूर चुंचाळे येथील भूमिपुत्र शेतकरी स्वयंसाह्यता बचत गटांच्या माध्यमातून महाजन आपल्या पदार्थांची विक्री विविध प्रदर्शने व अन्य भागात करतात.

रोपवाटिका

मोह वृक्षाचा प्रसार व्हावा यासाठी अवधूत रोपवाटिकाही महाजन यांनी चुंचाळे येथे विकसित केली आहे. यंदा ५० हजार रोपांची लागवड वन विभागाच्या मदतीने विविध भागांत झाली. प्रति रोपाची किंमत २० ते ५० रुपये आहे. उंचीनुसार ही किंमत ठरते. कीडनाशक म्हणून मोहफुलाच्या तेलाचा उपयोग

तर सूत्रकृमीचे नियंत्रण करण्यासाठीही पेंडीचा उपयोग ते करतात. मोह फुलांपासून मध संकलित करण्यासाठी मोह फळबागेत २० मधपेट्या त्यांनी ठेवल्या आहे. वन्य प्रकारातील रेशीम कीटकांच्या पालनासाठीही महाजन मोह फळबागेचा उपयोग करतात.

बी. जी. महाजन, ९७६७७१३३३२

डॉ. एच. एम. पाटील, ९४०४८८१५४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT