Pune News: यंदाच्या मार्च महिन्यात विक्रमी उष्णता राहण्याची शक्यता आहे. गहू आणि मोहरी उत्पादक असलेल्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ७ अंशांपर्यंत जास्त तापमान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांची उत्पादकता कमी राहून विक्रमी उत्पादनाच्या अंदाजावर परिणाम होऊ शकतो, असे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे..देशात यंदा गहू आणि मोहरीची लागवड विक्रमी पातळीवर झाली आहे. आतापर्यंत पोषक स्थिती असल्याने गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्च महिना रब्बी पिकांच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा असतो. नेमके याच महिन्यात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे..Wheat Harvesting: सुगीमध्ये शेतकरी कुटुंबे झाली मग्न.गहू उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा देशात विक्रमी गहू उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे गहू निर्यातही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोहरी उत्पादनात वाढीचा अंदाज असल्याने यंदा भारताची पामतेल, सोयातेल आणि सूर्यफूल तेल आयात कमी होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात गहू आणि मोहरीचे पीक दाणे भरण्याच्या आणि पक्व होण्याच्या स्थितीत असतात. तसेच मार्च महिन्यात अधिक तापमान राहिल्यास विजेलाही मागणी वाढेल. यामुळे शेती सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता आहे..Wheat Export: गहू निर्यातीला मंजुरी.ज्या राज्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे, त्या राज्यांमध्ये देशातील ८० टक्के गहू आणि मोहरी उत्पादन होते. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान लागवड होणाऱ्या गहू, मोहरी आणि हरभरा यांसारख्या रब्बी पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी थंड पाण्याचे सिंचन महत्त्वाचे असते. पण तापमानात वाढ झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. हवामान विभाग पुढील आठवड्यात मार्च महिन्याचा हवामान अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे..काही भागांत तापमान ७ अशांपर्यंत राहण्याची शक्यता‘‘उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये मार्च महिन्यात किमान आणि कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीयरित्या अधिक राहू शकतात. मार्च महिन्यात पंजाब, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा ७ अंशापर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे,’’ हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.