Sindhudurg News: सुंगधाकरिता ओळखल्या जाणाऱ्या सुरंगीच्या हंगामाला सिंधुदुर्गात प्रारंभ झाला आहे. सुरंगी कळीला प्रति किलोला ६०० ते ७०० रुपये दर मिळत आहे. जिल्ह्यातील १५ हून अधिक गावांमध्ये सुरंगीचे उत्पादन घेतले जाते. वार्षिक उलाढाल सुमारे १५ कोटींच्या जवळपास आहे..जिल्ह्यातील पंधरा गावांच्या अर्थकारणाला बळकटी देणाऱ्या सुरंगीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून सुरंगीच्या कळ्या, फुले काढणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १५ गावांमध्ये सुरंगीची लागवड आहे. यामध्ये आरवली, वडखोल सोन्सुरे, टाक, आसोली, रेडी, खानोली, फणसखोल, मोचेमाड (ता.वेंगुर्ला) धाकोरे, कोलगाव, कुणकेरी, (ता.सावंतवाडी) आकेरी (ता.कुडाळ) फोंडा (ता.कणकवली) करूळ (ता.वैभववाडी) या गावांचा समावेश आहे..Pune Market Theft: पुणे बाजारात चोरांचा सुळसुळाट.सध्या सुरंगी हंगामाला गती प्राप्त झाली आहे. महिना ते दीड महिनाच हा हंगाम चालतो. झाडाच्या खोडाला कळी आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसांत ती काढणीयोग्य होते. शेतकऱ्यांचा कळी (बटमोगरा) काढण्यावर अधिक भर असतो. या मालाला बाजारपेठेत चांगला दर मिळतो..Flower Farming: पारंपरिक शेतीला आधुनिक बाजारपेठेची जोड.सुरंगीची बाजारपेठ खूप मोठी असून व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात येऊन माल खरेदी करतात. सध्या कळीला प्रति किलो ६०० ते ७०० रुपये दर असून सरसकट प्रति किलो ३०० ते ४०० रुपये दराने सुरंगी खरेदी केली जात आहे. सुरंगीचा हंगाम सुरू होऊन आठ ते दहा दिवस झाले असून, अजून महिनाभर हा हंगाम चालण्याचा अंदाज आहे..१५ गावांमध्ये सुरंगीचे ४५ हेक्टर क्षेत्र आहे.प्रति झाड पाच ते सहा किलोपासून ७०ते ८० किलोपर्यंत उत्पादन देते.सुरंगीचे गजरे, वेण्या बनवून स्थानिक बाजारपेठेत ५० ते ७० रुपयांनी विक्री केल्या जातातउत्पादनात जिल्ह्यातील सुमारे ८५० कुटुंबांचा सहभाग.दिल्ली, अहमदाबाद, उज्जैनसह विविध शहरांमध्ये मागणी.७० टक्के आयुर्वेदिक औषधांसाठी, तर २० ते ३० टक्के वापर सौंदर्य प्रसाधने, सुगंधी द्रव्ये, रंगांसाठी वापर.सुरंगीची १५ कोटीपर्यंत उलाढाल..सुरंगीचा हंगाम सुरू झाला आहे. कळीला चांगला दर मिळतो. परंतु सरसकट मालाच्या दरात घसरण झालेली आहे. सुरंगीची काढणी अवघड असल्यामुळे मजुरांची वानवा आहे.तातोबा कुडव, सुरंगी उत्पादक, आरोली, ता. वेंगुर्ला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.