Pune News: राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत असून, उकाड्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज (ता. २८) उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..दक्षिण कर्नाटकमध्ये १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तर तमिळनाडूपासून मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यातच शुक्रवारी (ता. २७) पंजाबच्या भटिंडा येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज; राज्यातील किमान आणि कमाल तापमानात होतेय वाढ.सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये तमिळनाडूच्या मदुराई येथे देशातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे. अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाडा त्रासदायक ठरत आहे. आज (ता. २८) राज्याचे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..शुक्रवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३३.३---१४.७अहिल्यानगर---निरंक---१४.४धुळे---३४.५---१२.२जळगाव---३५.७---१८.१जेऊर---३६---१४कोल्हापूर---३४.५--१९.२महाबळेश्वर---२७.६---१४.९मालेगाव---३४---१५.८नाशिक---३३.३---१५.९.Weather Update: राज्यातील किमान आणि कमाल तापमानात होतेय वाढ.निफाड---३३.३---१५.५सांगली---३५.३---१८.२सातारा---३४.२---१५.५सोलापूर---३६.२---२०.८सांताक्रूझ---३०.७---२०.२डहाणू---३०.५---१७.८रत्नागिरी---३३.३---२१.३छत्रपती संभाजीनगर---३४.२---१९.८धाराशिव---३३.९---१९.८परभणी---३४.३---२०.४परभणी (कृषी)---३४---१५.४अकोला---३६.३---२१.२.अमरावती---३६.२---२०.७भंडारा---३१---१९बुलडाणा---३४.६---२०.२ब्रह्मपुरी---३६---१७.४चंद्रपूर---३४.६---२०.८गडचिरोली---३३.६---१७गोंदिया---३२.८---१४.६नागपूर---३३.२---१६.८वर्धा---३५---१७.६वाशीम---३५---१७.६यवतमाळ---३३---१९.४.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१२---३५.७पश्चिम महाराष्ट्र---१४---३६.२मराठवाडा---१५.४---३४.३विदर्भ---१४.६---३६.३कोकण---१७.८---३३.३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.