Mahabeej  Agrowon
ॲग्रो विशेष

Mahabeej : ‘महाबीज’चा १४ हजार हेक्टरवर खरीप बीजोत्पादन कार्यक्रम

Kharif Seed Production Program : महाबीजच्या परभणी विभागांतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये या वर्षीच्या (२०२४) खरीप हंगामात नोंदणीकृत ७ हजार २३९ शेतकरी १४ हजार ४७० हेक्टरवर विविध पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेत आहेत.

Team Agrowon

Parbhani News : महाबीजच्या परभणी विभागांतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये या वर्षीच्या (२०२४) खरीप हंगामात नोंदणीकृत ७ हजार २३९ शेतकरी १४ हजार ४७० हेक्टरवर विविध पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेत आहेत. त्यापासून १ लाख ९८ हजार क्विंटल कच्चे बियाणे उत्पादन अपेक्षित आहे, अशी माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड यांनी दिली.

महाबीजच्या परभणी विभागात दरवर्षी खरिपात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्युट आदी पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येतो. त्यात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असते. यंदा १९ हजार ४२२ हेक्टर उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १४ हजार ४७०.६१ हेक्टर बीजोत्पादन कार्यक्रमाची नोंदणी आहे. यंदा विभागातील सहा जिल्ह्यांत मिळून एकूण सोयाबीनचा १३ हजार ९३१ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम आहे.

तुरीचा १८९.२० हेक्टर, मूग ७७.९३ हेक्टर, उडीद २०५ हेक्टर, ज्युटचा ६६.४० हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम आहे. यंदाच्या बीजोत्पादनामध्ये परभणी जिल्ह्यातील २ हजार १७५ शेतकऱ्यांनी ४ हजार ४२६.८४ हेक्टरवर तर हिंगोली जिल्ह्यातील १ हजार २६३ शेतकऱ्यांनी २ हजार ८४८ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील ४९७ शेतकऱ्यांनी १ हजार ४४ हेक्टरवर, लातूर जिल्ह्यातील १ हजार ९१० शेतकऱ्यांनी ३ हजार ६११ हेक्टवर, धाराशिव जिल्ह्यतील १ हजार ९० शेतकऱ्यांनी १ हजार ९८९ हेक्टरवर, सोलापूर जिल्ह्यतील ३०४ शेतकऱ्यांनी ५५१ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रमाची नोंदणी केली आहे.

परभणी विभाग २०२४ खरीप बीजोत्पादन क्षेत्र स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

जिल्हा सोयाबीन तूर मूग उडीद ज्युट एकूण

परभणी ४२८१.६० ४५.६० ६०.२० १२.२४ २७.२० ४४२६.८४

हिंगोली २८४८.४० ०० ०० ०० ०० २८४८.४०

नांदेड ९८६.७५ ०० ८.४० ४०.१६ ८.८० १०४४.११

लातूर ३४६०.२२ ५८.६० ९.१३ ५५.७१ २७.२० ३६११.०६

धाराशिव १९०५.२० ३८.० ०० ४२.८० ३.२० १९८९.२०

सोलापूर ४४९.२० ४७.०० ०० ५४.८० ०० ५५१.००

परभणी विभाग तुलनात्मक बीजोत्पादन क्षेत्र (हेक्टरमध्ये)

वर्षे क्षेत्र

२०२१ २०१३०

२०२२ १३५४८

२०२३ १५०३३

२०२४ १४४७०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Congress Protest: 'सरेंडर दे सिलिंडर'; गॅसचं पोस्टर घेऊन पटोले, वडेट्टीवार विधानभवनात

Sunflower Farming: घाटनांद्रा परिसरात बहरली सूर्यफुलाची शेती

Chana Procurement Centers: हरभरा खरेदीसाठी नऊ केंद्रांना मंजुरी; २४ केंद्रांवर मका खरेदी सुरू

Biogas Plant: बायोगॅस ठरू शकतो दीर्घकालीन उपाय

MahaVistar AI: ज्ञानार्जनासाठी हक्काचे व्यासपीठ

SCROLL FOR NEXT