Mahabeej : ‘महाबीज’चा अतिरिक्त पदभार कलंत्रेंकडेच

Sachin Kalantre : शासनाचे आदेश; संचालक, भागधारकांच्या मागणीची दखल
Mahabeej
MahabeejAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Akola News : अकोला ः गेल्या आठवड्यात ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांची बदली करण्यात आल्याने शेतकरी, भागधारक, संचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महाबीज संचालकांची ही बदली रद्द करावी यासाठी थेट मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांकडे मागणी केली. आमदार रणधीर सावरकर यांनीही विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला. याची दखल घेत शासनाने बुधवारी (ता. १०) महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त पदभार सचिन कलंत्रे सांभाळतील, असे आदेश काढले.

महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक असलेले श्री. कलंत्रे यांची अमरावती महापालिकेत आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी शासनाच्या आदेशानंतर तातडीने अमरावती येथे पदभारही स्वीकारला. मात्र ही बदली वेळेपूर्वी केल्याने महाबीज भागधारक, संचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

Mahabeej
Mahabeej : शेतकर्‍यांसाठी अविरत झटणारे ‘महाबीज’

कलंत्रे यांनी आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात महाबीजचे प्रशासन, नियोजन अशा विविध पातळ्यांवर कामकाजात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळेच महाबीजच्या नफ्यात, कामकाजात सुधारणा झाली. शिवाय महाबीजच्या बीजोत्पादकांचे तीन वर्षांपासून रखडलेले विविध योजनांचे सुमारे २५ कोटींपेक्षा अधिक रकमेचे अनुदान मिळवून देण्यातही पुढाकार घेतला होता. त्यामुळे कलंत्रे यांची हंगामाच्या काळात बदली करू नये, अशी मागणी महाबीज संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजित सपकाळ व भागधारकांनी केली होती. पावसाळी अधिवेशनात अकोल्याचे आ. सावरकर यांनीही कलंत्रे यांची बदली करण्यामागे मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या हेतूवर प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. या सर्व बाबींची दखल घेत कलंत्रे यांना महाबीज व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारण्याबाबत तातडीने आदेश देण्यात आले आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयाचे महाबीजच्या भागधारक, संचालकांनी स्वागत केले आहे.

प्रतिक्रिया..
ऐन हंगामात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यामागे नेमका हेतू काय, हे समजले नव्हते. सचिन कलंत्रे महाबीजमध्ये चांगले काम करीत होते. त्यांच्या बदलीची मागणी व कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना त्यांना बदलण्यात आले होते. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे बदली रद्दची मागणी केली. शासनाने बदली रद्द केलेली नसली तरी त्यांच्याकडे महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त पदभार कायम ठेवला आहे. हे समाधानकारक वाटते.
- वल्लभराव देशमुख, संचालक, महाबीज, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com